नवी मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Ganesh Naik To Awhad) यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यात राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांवर हल्लाबोल केला होता. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक”, नाना पाटेकरांच्या सिनेमातील या डायलॉग म्हणत गणेश नाईक यांनी आव्हाडांवर पलटवार केला.
जितेंद्र आव्हाड यांनी काल नवी मुंबईत झालेल्या (Ganesh Naik To Awhad) राष्ट्रवादी युवक मेळाव्यात गणेश नाईकांवर अनेक टीकास्त्र सोडलं. तसेच, अनेक आरोपही त्यांच्यावर केले. याचं मुद्यावर आता गणेश नाईक यांनी आव्हाडांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा : गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करा : जितेंद्र आव्हाड
“कोणी मुंबईवरुन, कोणी ठाण्यावरुन, कोणी पुण्यावरुन या शहराचा कारभार करु शकतं का? आणि करु शकतील, तर पहिला तुमच्या शहरात करा”, असं म्हणत गणेश नाईकांनी राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईक हे खंडणी घेतात, धमकी देतात, असे अनेक आरोप केले. त्यावर गणेश नाईकांनी उत्तर देत म्हटलं, “कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसी पण नाही.”
“संदीप नाईकचा बळी दिला म्हणतो. पण, मी संदीपला इथून लढ म्हणालो होतो. हे सर्व कार्यकर्त्यांना माहित आहे”, असं म्हणत गणेश नाईकांनी जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांना फेटाळलं.
“हाथी चलता हैं अपनी चाल, अब जिस्को जो समझना हैं समजलो. हिम्मत असेल, तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचं पुरावे घेऊन केस करा, गणेश नाईक ताकदीने उभा आहे”, असं म्हणत गणेश नाईकांनी (Ganesh Naik To Awhad) जितेंद्र आव्हाडांना खुलं आव्हान दिलं.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“काय केले या नाईकांनी. जे झाले ते काँग्रेसच्या माध्यमातून झाले. आता दिवस संपले. माझे देखील आयुष्य यांनी खराब केलं, माझे कुटुंब देखील खराब केलं, शरद पवार यांना सांगितले आम्ही जाणार नाही आणि भाजपात गेले. अशा गद्दारांना मी विचारत नाही”, असं म्हणत आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले.
“इमारतींचे आणि इतर कंत्राट कोणाकडे. खंडणी आणि धमकी या नवी मुंबईत कोणाचे चालते या गणेश नाईक यांचे. एवढीच श्रीमंती असेल तर जागा गरिबांना कधी देणार”, असं म्हणत आव्हाडांनी गणेश नाईकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
“शरद पवारांनी गणेश नाईक यांना सर्वकाही दिले, तरी सुद्धा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसले.”
“चौघुले हा माझा मित्र होता. पण, काय करणार संजीव नाईक यांना मी मदत केली. मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवला”, असंही आव्हाड म्हणाले.
“काही लोकांचे नाशीब आहे, ते शिवसेनेकडे गेले आणि त्यानंतर पवारांकडे आले. सत्तेसाठी काय काय करायचे हे नाईकांना माहित आहे. गणेश नाईक कोणीही नाही, ते स्वतःचे खिशे भरण्यासाठी लढले. मंदा म्हात्रे यांना नाराज केले. गणेश नाईकमुळे ते पक्ष सोडून गेले. गणेश नाईकमुळे विजय चौघुले यांचे देखील तिकीट कापले.”
गणेश नाईक इथे पोहोचले ते पवार आणि आई-वडिलांमुळे : जितेंद्र आव्हाड
“एक वेळी मुघलांची सलतनत संपेल, पण गणेश नाईक यांची नाही. मी प्रत्येक दिवस आता नाईक यांच्या बिषयी बोलणार. माझी खाट पाडणारे हे गणेश नाईक, तरी सुद्धा मी ठाणे कायम ठेवले. मी यांच्याकडून कधीही पैसे घेतले नाही. परंतु त्यांच्या प्रचारात मी करोडो पैसे खर्च केले. त्याचे उत्तर द्यावे. कमीत कमी, माझे अस्तित्व संपवणारे हे गणेश नाईक आतापर्यंत इथे पोहोचले ते पवार आणि आई-वडिलांमुळे. 30 वर्षांपासून राजकारणात असलेल्या या रावणाला भस्मासूर करायला आलो. आता आरे ला कारेने उत्तर देणार”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
संबंधित बातम्या :
पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत : छगन भुजबळ
कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार
मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…
नवी मुंबईत आता त्यांची ताकद राहिली नाही, रोहित पवारांचा गणेश नाईकांना टोला