जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, आता राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा आहे. बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. जामनेर येथे महाजन यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. महाजनांच्या पत्नी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, कन्या श्रेया यांच्यासह सहकुटुंब पूजा करण्यात आली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाजनांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीनं गणेशाची स्थापना करण्यात आली. (Ganeshotsav 2021 BJP leader Girish Mahajan’s request to Ganpati Bappa)
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून माहाविकास आघाडीचे सरकार आहे. जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. राज्यात कुणीही सुखी नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार लवकर जावे, असं वाटतं. तसेच भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा या राज्यात यावे असं जनतेला वाटत आहे. गणरायाची सुध्दा तीच इच्छा आहे. त्यामुळे आपण त्यांना सरकार बदलण्याचे साकडं घालणार नाही. गणरायाचं आता सरकार बदलण्याची इच्छा पूर्ण करून, राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील कोरोना आणि महापुराचे संकट दूर होऊ दे, अशी याचना आपण गणरायाकडे केल्याचं महाजन यांनी सांगितलं.
आज जामनेर येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली.
महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ अशी निर्माण झालेली विचित्र परिस्थिती दूर व्हावी, कोरोनाचे संकट कायमचे जावे, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी लाभावे यासाठी गणरायाला साकडे घातले. pic.twitter.com/2uIJuYhoVS
— Girish Mahajan (@girishdmahajan) September 10, 2021
श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण त्यांना साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे, ते संकट आता दूर झालं पाहिजे. आपलं जीवन पूर्वीसारखं सुचारू झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येतात, कधी पुराचं, कधी वादळाचं तर कधी अतिवृष्टीचं आहे, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. त्याचसोबत गणरायाने आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी अशीही प्रार्थना आहे.
मंदिरं सुरु करण्याचं आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत, आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतंय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरु होऊ शकतं तर मंदिर का नाही? सरकारनं नक्की नियमावली लावाली. आज देशभरातील मंदिरं सुरु आहेत, फक्त महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, मागणी यावेळी फडणवीसांनी केलीय.
इतर बातम्या :
केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय; ईडीच्या कारवाईवरून सरनाईक यांचा घरचा आहेर
Ganeshotsav 2021 BJP leader Girish Mahajan’s request to Ganpati Bappa