मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडीवरुन राजस्थानचे राजकारण (Rajasthan Politics) तापले, असे असतानाच आता अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नवेच नाव चर्चेत आले आहे. आतापर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरुर यांची नावे चर्चेत होती. शिवाय अध्यक्षपदी गहलोत तर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद कुणाकडे यावरुन गदारोळ सुरु असतानाच आता दिग्विजय सिंह (Digvijay Singh) हे देखील अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. एवढेच नाहीतर निवडणुकासाठी ते लवकरच आपला अर्जही दाखल करणार आहेत.
पुढील महिन्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुक होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस कुटुंबातील कोणीही सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच राहुल गांधी यांनी सांगितले होते. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरुर यांची नावे चर्चेत होती. पण आता या निवडणुकीत दिग्विजय सिंह देखील नशीब आजमावणार आहेत.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीला घेऊन दिवसागणीस वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. आतापर्यंत दिग्विजय सिंह यांचे नाव चर्चेत नव्हते. पण ते देखील निवडणुक लढवणार आहेत. तर लवकरच आपला अर्जही दाखल करणार आहेत.
निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस पक्षाने काही नियमावली जारी केली असून त्यामध्ये एक व्यक्ती, एक पद असे सूत्र आहे. त्यामुळे अध्यक्ष असणाऱ्या व्यक्तिला इतर कोणत्याही पदावर राहता येणार नाही.
कॉंग्रेस पक्षाने नियमावली जारी केली असली तरी राजस्थानमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री असलेले अशोक गहलोत हे अध्यक्षपदासाठी फारसे इच्छूक नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदी कोण यामुळे अतंर्गत मतभेद हे चव्हाट्यावर आले आहेत.