पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. गिरीश बापट यांचं नाव लोकसभेसाठी जाहीर झाल्यानंतर, पुण्यात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. गिरीश बापट लोकसभेवर गेल्यास त्यांच्या जागी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण यांचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.
गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे, आता कसबा विधानसभेसाठी इच्छुकांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गिरीश बापट यांची सून वरदा बापट, महापौर मुक्ता टिळक, गणेश बिडकर यांच्या नावाची कसबा विधानसभेसाठी चर्चा सुरु झाली आहे.
गिरीश बापटांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभेचं प्रतिनिधीत्व केले आहे. आता तब्बल 25 वर्षांनंतर कसबा विधानसभेला नवीन उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये अपेक्षित आहे. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात आतापासूनच चुरस पाहायला मिळत आहे.
शिरोळेंचा पत्ता कट
आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तिसरी यादीही जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भापजने दोन विद्यमान खासदारांना डच्चू दिला होता. तिसऱ्या यादीतही भाजपने पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू दिला आहे. शिरोळेंच्या जागी सध्याचे राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
भाजपच्या तिसऱ्या यादीत मुंडे गटातील खासदाराला डच्चू
भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित
भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू
भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित
पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी