नाना पटोलेंची बुद्धी भ्रमिष्ट, फडणवीसांविरोधात हक्कभंगाचं वक्तव्य भाजप नेत्यांनी उडवून लावलं….

| Updated on: Dec 23, 2022 | 3:15 PM

दिल्लीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नाना पटोले गेले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.

नाना पटोलेंची बुद्धी भ्रमिष्ट, फडणवीसांविरोधात हक्कभंगाचं वक्तव्य भाजप नेत्यांनी उडवून लावलं....
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Image Credit source: social media
Follow us on

नागपूरः विधानसभेत चुकीची माहिती दिल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. मात्र नाना पटोले स्वतः महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष राहिले असताना यावरून हक्कभंग आणणार हे ऐकून भाजप नेत्यांनी त्यांची खिल्लीच उडवली आहे. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी तर नाना पटोलेंची बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं. तर गिरीश महाजन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

गिरीश महाजन म्हणाले, नाना पटोले स्वतः काही काळ अध्यक्ष राहिले आहेत. इथलं कामकाज त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते असं बोलणार नाहीत. पण बोलले असतील तर यावर आता काय प्रतिक्रिया देणार…

तर भाजप नेते प्रविण दरेकर यांनीही नाना पटोलेंवक टीका केली. काँग्रेसचा कुठेच ताळमेळ बसत नाहीये. त्यामुळे ते हक्कभंग आणण्याची भाषा करतायत, असं वक्तव्य त्यांनी केलं.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी गटाने लावून धरली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. मात्र दिशा सालियानची सीबीआय चौकशी झालेली असताना एसआयटी चौकशी कशासाठी करायची असा सवाल विरोधकांनी केला.

त्यानंतर दिशा सालियान प्रकरणात सीबीआय चौकशी झालीच नाही, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली. याच मुद्द्यावरून नाना पटोलेंनी गंभीर आरोप केलाय.

फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात चुकीची माहिती दिली, यावरुन सोमवारी हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला. दिल्लीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नाना पटोले गेले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.