जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असणाऱ्या जळगावातील (Jalgaon) राजकीय वातावरण तापलं आहे. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. गिरीश महाजन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. या टीकेपासून वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. या टीकेला आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.
गिरीश महाजन यांनी काही वृत्तपत्रांशी फोनवर बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल उत्तर दिले आहे. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं होतं.
गिरीश महाजन यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 8 जानेवारीपासून स्वत: ला घरीचं क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ते घरीच उपचार करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्का त आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
इतर बातम्या :
मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे
Girish Mahajan gave answer to Eknath Khadse on statement made by khadse against him