नवी दिल्ली: राफेल (Rafale) मुद्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजपवर हल्लाबोल केला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सर्व माहिती खोटी दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले, “संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत खोटी माहिती दिली. राफेलबाबत होय किंवा नाही अशी उत्तरं देण्याची मागणी मी केली होती. फक्त 36 विमानांचा करार का ? अंबानींच्या कंपनीची निवड का? संरक्षण मंत्री या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या आहेत”
याशिवाय अंबानींच्या कंपनीला 30 हजार कोटीच्या प्रोजेक्टमध्ये भागीदार का बनवलं, असा सवाल त्यांनी केला.
15 मिनिटे द्या
यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना खुलं आव्हान दिलं. “देशाचा चौकीदार लोकसभेत येण्यास घाबरत आहे. नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत 15 मिनिटांची चर्चा करावी, मला सोळावा मिनिटही नको, सर्व काही उघड होईल. मोदी चर्चा करत नाहीत, कारण चौकीदार चोर आहे”.
HAL कडे पगाराचेही पैसे नाहीत
राहुल गांधी यांनी HAL मुद्द्यावरुन सरकारला घेरताना, HAL कडे कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठीही पैसा नसल्याचा आरोप केला. राफेल विमानासाठी कंत्राटी भागीदार अंबानींची कंपनी आहे. त्यामुळे अंबानींना कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्साठी HAL कंपनीच्या इंजिनिअर्सची मदत लागेल. त्यामुळे पगाराविना काम करणारे इंजिनियर्स अंबानींच्या कंपनीत जाण्यास मजबूर असतील, असं राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi: Today Nirmala Sitharaman lied in parliament.I’m again requesting the Defence minister and PM Modi to answer “did Air Force and Defence ministry senior officers object to your interference in Rafale deal?” Please answer in a “Yes or No.” pic.twitter.com/BcbPCucPeS
— ANI (@ANI) January 7, 2019