पुणे : मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने या जागेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याऐवजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणी एका शिवसैनिकाने केली आहे. पार्थ पवारांविरोधात आदित्य ठाकरे किंवा युवासेनेतील एखाद्या नेत्याला उमेदवारी द्यावी, असं म्हणत या शिवसैनिकाने श्रीरंग बारणेंविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
शिवसैनिकाचं पत्र जसंच्या तसं
प्रती,
मा उध्वजी ठाकरेसाहेब.
शिवसेना पक्षप्रमुख.
सस्नेह जय महाराष्ट्र..
विषय- मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी न देता युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते अदित्यजी ठाकरेसाहेब किंवा युवासेनेतील आभ्यासु पदाधिकारी यांनाच लोकसभेची उमेदवारी देऊन नविन खासदारांनकडुन जुना व नविन वाद संपूष्टात आणुन योग्य समन्वय साधुन शिवसेना वाढीसाठी मदत होईल.
मोहदय काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून आप्पा बारणे यांनी खासदार झाल्यानंतर मावळमधील व पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांवरच सूड उगवले आहेत.
खासदार आप्पा बारणे हे पदाचा वेळोवेळी गैरवापर करत पक्षाला चुकीची माहीती देऊन बाहेरील कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्याच कायॕकत्याॕना विविध शासकीय सदस्य पद दिलेली आहेत. दगाफटका करणाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना चालवत आहेत.
आप्पा बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास आपल्या शिवसेना पक्षाला मावळमध्ये दगाफटका होऊन पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपल्या शिवसेनेने आप्पा बारणे यांच्याऐवजी पाथॕ आजित पवारच्या विरोधात युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते अदित्यजी ठाकरेसाहेब किंवा युवासेनेतील योग्य आभ्यासु उमेदवाराचा विचार करावा.
मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग आप्पा बारणे हे त्यांनी केलेल्या कतृत्वाने सक्षम उमेदवार नसून, लोकसभा निवडणुकीतही श्रीरंग आप्पा बारणे यांचा पराभव झाल्यास शिवसेनेसोबत भाजपलाही त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागणार आहे. तसे होऊ नये म्हणून आपल्या शिवसेनेने बारणे यांच्याऐवजी निवडून येणारा सक्षम उमेदवार द्यावा, मागणी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी आप्पा बारणे यांनी थेरगावमध्ये आपल्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचा एकही नगरसेवक उपस्थित राहिला नाही . व मोजकेच स्वताच्या मजीॕतील पदाधिकारी उपस्थित होते.
आदरणीय साहेब *“काँग्रेसमधून आपल्या शिवसेनेत आलेले श्रीरंग बारणे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांच्या बळावर चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले. मातोश्रीमधुन आपला आदेश आल्याने माझ्या सारख्या सवॕसामान्य कुटूबांतील शिवसैनिकांनी आप्पा बारणे यांचे काम केले. खासदार झाल्यानंतर आप्पा बारणे यांचा शिवसैनिकांकडून प्रत्येक ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात आला. पण त्यानंतर बारणे यांनी वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेसाहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सच्च्या शिवसैनिकांवर सूड उगवण्याचे काम केले. सच्च्या शिवसैनिकांना गाडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मोठे करण्याचे काम आप्पा बारणे यांनी केले .
बारणे यांच्या मनमानी कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १४ नगरसेवकांन वरून ९ वर आलेली आहे.
यात माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला देखील पराभव पत्कारावा लागला.आप्पा बारणे यांनी व्यवस्थित नियोजन केले आसतेतर माझ्या शिवसैनिकांचा पराभव झाला नसतात आपण किमान २२ते २५ आपल्या शिवसेनेचे नगरसेवक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत निवडुन आले आसते.
पिंपरी-चिंचवड शहर व मावळ शिवसेनेत खासदार आप्पा बारणे यांनी गटातटाचे राजकारण सुरू केले.लोकसभा निवडणुकीत खासदार आप्पा बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास निवडणुकीत पक्षाला दगाफटका बसेल. आपल्या शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागेल. निष्ठावंत शिवसैनिकांची खरी व्यथा पाहता मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत आपल्या पक्षाने एकदा गंभीरपणे विचार करावा.
खासदार आप्पा बारणे यांच्याऐवजी मावळ लोकसभा मतदारसंघात आप्पा बारणे यांना उमेदवारी न देता युवासेना प्रमुख शिवसेनानेते अदित्यजी ठाकरेसाहेब किंवा युवासेनेतील सक्षम आशा पदाधिकार्यांना उमेदवाराचा विचार करावा, अशी मागणी मी एक वंदनिय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक करित आहे.
काही चुकल आसल्यास तसेच भावनेच्या भरात पोरखड हट्ट केलाय म्हणून राग मानु नये.मी युवराज भगवान दाखले आपली हात जोडुन मापी मागतो.शेवटी आपला आदेशाचे शेवटच्या श्वासापयॕत पालन केले जाईल.
होय मावळ लोकसभेवर भगवा फडकविणारच…
कळावे,
आपला नंम्र.
युवराज भगवान दाखले.
प्रदेश अध्यक्ष-शिवशाही व्यापारीसंघ.
तथा
शहरप्रमुख लहुजी शक्तीसेना पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा.
अखंड बाराबलुतेदार समाजबांधव.