‘गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ, डिपॉझिट जरी वाचले तरी…’,आशिष शेलारांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

| Updated on: Jan 21, 2022 | 5:24 PM

"गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल", असं आव्हानच आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला होता.

गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ, डिपॉझिट जरी वाचले तरी...,आशिष शेलारांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज
संजय राऊत, आशिष शेलार
Follow us on

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 9 उमेदवारांची पहिली यादी (Shivsena Candidate List) आज जाहीर केली आहे. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या उमेदवारीवरून भाजपला खडे बोल सुनावले आणि भाजपच्या तिकीट वाटपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. भाजपने घराणेशाहीच्या नावाखाली उत्पल पर्रीकर (Uttpal Parrikar) यांचे तिकीट कापले, मात्र वाळपई, पर्ये, पणजीत, ताळगावमध्ये घराणेशाहीलाच वाव दिला, अशी टीका राऊतांनी केलीय. त्यावर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.

“गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल”, असं आव्हानच आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला होता. गोव्यात 2017 ला शिवसेना लढली तेव्हा 3 जागा लढवून त्यांना 792 मतं मिळाली. सर्व तीन जागांवर डिपॉझिट जप्त झालं. आता हे गोव्यात सरकार बनवणार, सरकार बनवणाऱ्यांना मदत करणार तर उत्तर प्रदेशात शिवसेनेनं 57 जागा लढल्या. 88 हजार 752 मतं मिळाली. 11 कोटी मतदारांमध्ये 88 हजार 595 मतं मिळाली. 57 पैकी 56 जागांवर डिपॉजिट जप्त झालं. आता हे उत्तर प्रदेशात टिकैत यांना, अखिलेश यादवांना आवाहन करणार आहेत की आम्हाला सोबत घ्या, असा टोला पाटील राऊतांना लगावला होता. त्यानंतर आता शेलार यांनी राऊतांना डिपॉझिटवरुन थेट ओपन चॅलेंज दिलंय.

‘..तर शिवसेना उमेदवार मागे घेईल!’

दरम्यान, भाजपकडून पणजीमधून बाबूश मोन्सेरात तर ताळगावमधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात निवडणूक लढवणार आहेत. याच बरोबर वाळपईतून विश्वजीत प्रतापसिंग राणे आणि पर्येतून दिव्या विश्वजीत राणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. त्याचबरोबर उत्पल पर्रीकर यांच्या विषयात मी खूप काही वाचले आहे. त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवली तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल, असा दावाही राऊत यांनी केलाय.

शिवसेनेने उतरवला RSS चा तगडा उमेदवार

गोवा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात प्रथमच उतरत असलेल्या शिवसेनेने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गोव्यातील ज्येष्ठ राजकीय नेते सुभाष वेलिंगकर यांचे चिरंजीव आणि RSS चे शिलेदार शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीतून उमेदवारी देण्याचे शिवसेने जाहीर केले आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनाची प्रमुख जबाबदारीदेखील सोपवली आहे. भाजपच्या बाबूश मॉन्सेरात यांच्याविरोधात शिवसेनेने तगडा उमेदवार उतरवला आहे.

इतर बातम्या :

‘गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवलं जात असेल तर तीव्र विरोध करु’, अमोल कोल्हेंच्या त्या चित्रपटाविरोधात काँग्रेस आक्रमक

अमर जवान ज्योत विझवून मोदी सरकारकडून वीर जवानांचा घोर अपमान, आरएसएस, भाजपला शौर्य काय कळणार-नाना पटोले