पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) मोठा विजय मिळवत भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलीय. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. अशावेळी काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी मोठा दावा केलाय. ‘गोव्याच्या राजकारणात काहीही असंभव नाही. गोव्यातील वास्तव पाहता गोव्यात अचानक बदल होऊ शकतो. आम्ही येणाऱ्या काही महिन्यात सरकार बनवू आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. एक-दीड वर्षात आम्ही सरकार बनवण्यात सक्षम होवू’, असा दावाही लोबो यांनी केलाय. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार लोबो यांना विचारण्यात आलं की, भाजपकडे 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी संख्याबळ कसं गोळा कराल? त्यावर पुढील वर्ष महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष लवकरच गती पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल, असा दावा लोबो यांनी केलाय.
लोबो म्हणाले की, आता आमच्याकडे 15 आमदारांचं संख्याबळ आहे. तीन अपक्ष आणि दोन जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकतं. जनतेनंही आपलै वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पाहावं लागेल की 67.33 टक्के लोकांना भाजप सरकार नको असल्याचं निवडणुकीत सिद्ध झालंय. त्यामुळे त्यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आवाज उठवायला हवा.
गोव्याच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे विरोधी पक्षनेते @MichaelLobo76 का म्हणतात? ऐका त्यांच्याच शब्दांत. pic.twitter.com/MldZXjT9NO
— गोवन वार्ता UPDATES (@goanvarta) April 1, 2022
गोव्यात काँग्रेसला पुनर्जीवित करण्याची जबाबदारी घेतल्याचं मायकल लोबो यांनी सांगितलं. 60 टक्के गोवा वासीयांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं आहे. भाजपला फक्त 32 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे मी नव्या जबाबदारीसह प्रतिनिधित्व करतोय. 67 टक्के लोकांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन होईल याची मला खात्री आहे, असा दावाही लोबो यांनी केलाय.
गोव्यात भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि एंटोनियो वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलेलं आहे. तसेच एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे.
इतर बातम्या :