Gokul Dudh Sangh Election Final Result | डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील

| Updated on: May 04, 2021 | 11:21 PM

Gokul Election Result Kolhapur Live : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना होत आहे.

Gokul Dudh Sangh Election Final Result | डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार - सतेज पाटील
सतेज पाटील वि. महादेवराव महाडिक
Follow us on

कोल्हापूर : बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.  पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध (Gokul Dudh Sangh Result) संघावर कुणाची सत्ता? हे आता स्पष्ट झालं आहे. येथे गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं होतं. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik), माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. दिवसभर मतमोजणी सुरु होती. मात्र, आता शेवटी निकाल स्पष्ट झाला आहे. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. येथे एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Gokul Election 2021 Kolhapur Dudh Sangh Result live today Mahadevrao Mahadik vs Satej Patil Hasan Mushrif Maharashtra Gokul Doodh Sangh Election)

गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला.  सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सुरुवातीपासूनच आव्हान दिलं होतं. शेवटी सतेज पाटील गटने मोठी घोडदौड करत विजयश्री खेचून आणला.

राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी- 17 जागा

राजर्षी शाहू आघाडी- 4 जागा

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 May 2021 09:26 PM (IST)

    Satej Patil On Gokul Dudh Sangh Election | डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील

    गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. दूध गोकूळ संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले.

  • 04 May 2021 08:51 PM (IST)

    Gokul Dudh Sangh Final Result : सतेज पाटील गटाचा 17 जागांवर विजय, महाडिक गटाची तीन दशकांची सत्ता संपुष्टात

    कोल्हापूर : गोकुळमध्ये अखेर सत्तांतर, 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागा, सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर मानव लागलं समाधान, आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात


  • 04 May 2021 08:22 PM (IST)

    Gokul Dudh Sangh Result Live : मतमोजणीच्या दोन फेऱ्या बाकी, सतेज पाटील गटाचे 16 पैकी 13 उमेदवार आघाडीवर

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक मतमोजणी अपडेट,मतमोजणीच्या सहाव्या फेरीतदेखील सतेज पाटील यांच्या गटाचे वर्चस्व, सतेज पाटील गटाचे 16 पैकी 13  उमेदवार आघाडीवर, मतमोजणीच्या अद्याप दोन फेऱ्या बाकी

  • 04 May 2021 07:06 PM (IST)

    चौथ्या फेऱीअखेर स्थिती काय, जाणून घ्या कोण आघाडीवर कोण पिछाडीवर ?

    कोल्हापूर : गोकूळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी होत असून सध्या पाचव्या फेरीअखेर सतेज पाटील गटाचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीअखेर आघाडीवर असलेले राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे म्हणजेच सतेज पाटील गटाच्या उमेदवारांची नावे

    1. अरुनकुमार डोंगळे

    2. अभिजित तायशेटे

    3. विश्वास नारायण पाटील

    4. अजित नरके

    5. शशिकांत पाटील-चुयेकर

    6. किसन चौगुले

    7. नविद मुश्रीफ

    8. रणजित पाटील

    9. नंदकुमार डेंगे

    10. बाबासाहेब चौगुले

    11. करणसिंह गायकवाड

    12. प्रकाश पाटील

    13. एस आर पाटील

    सत्ताधारी गटाचे म्हणजेच महाडिक गटाचे आघाडीवर असलेले उमेदवार

    1. अमरीश घाटगे ( सत्ताधारी आघाडी )

    2. बाळासो खाडे ( सत्ताधारी आघाडी)

    3. चेतन नरके ( सत्ताधारी आघाडी )

  • 04 May 2021 07:00 PM (IST)

    Gokul Dudh Sangh Result : सतेज पाटील गटाची घोडदौड कायम, पाचव्या फेरीत 13 उमेदवार आघाडीवर

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघ मतमोजणी अपडेट, पाचव्या फेरीतसुद्धा सतेज पाटील गटाची घोडदौड कायम, सतेज पाटील गटाचे 13 उमेदवार आघाडीवर, सत्ताधारी महाडिक गटाचे तीन उमेदवार आघाडीवर, मतमोजणीच्या आणखी तीन फेऱ्या बाकी

  • 04 May 2021 06:29 PM (IST)

    Gokul Dudh Sangh Result Live : सतेज पाटील गटाची घोडदौड, 13 उमेदवार आघाडीवर

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक :  सतेज पाटील गटाची घोडदौड, चौथ्या फेरीते विरोधी गटाचे  13  तर सत्ताधारी महाडिक गटाचे 3 उमेदवार आघाडीवर, अजून 4 फेऱ्या बाकी

  • 04 May 2021 05:41 PM (IST)

    Gokul Dudh Sangh Election Result : तिसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडीची पुन्हा सरशी

    कोल्हापूर : गोकुळ निवडणूक मतमोजणी – तिसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडीची पुन्हा सरशी, विरोधी आघाडीचे 12 उमेदवार आघाडीवर तर सत्ताधारी गटाचे चार उमेदवार आघाडीवर

    आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार, सतेज पाटील गटाचे 4  तर महाडिक गटाचा एक उमेदवार विजयी

    सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी

    सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी
    अमर पाटील – 436 मतांनी विजयी
    बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी

    अंजना रेडेकर –  विजयी

    महाडिक गटाचे उमेदवार 

    महाडिक गटाकडून –  शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी

  • 04 May 2021 05:07 PM (IST)

    Gokul result live दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी आघाडीचे 9 उमेदवार आघाडीवर

    कोल्हापूर : गोकुळ निवडणूक –  दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी आघाडीचे 9 उमेदवार आघाडीवर , विरोधी गटाचे 7 उमेदवार आघाडीवर, अजून सहा फेऱ्यांची मतमोजणी बाकी, क्रॉस वोटिंगने सत्ताधारी आणि विरोधकांचे ही टेन्शन वाढवले.

  • 04 May 2021 04:05 PM (IST)

    Gokul Election result : बंटी-महाडिक गटात चुरस कायम

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निकालात सतेज पाटील गटाचं पारडं जड, सतेज पाटील गट आणि महादेवराव महाडिक गटात यांच्यात चुरस कायम, दोन्ही गटातील उमेदवारांमध्ये काही मतांचाच फरक, शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता राहणार

  • 04 May 2021 01:20 PM (IST)

    Gokul election Shaumika Mahadik result live : शौमिका महाडिक विजयी

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक : सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी, तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी, महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी, पहिल्यांदाच दिली होती उमेदवारी, महादेवराव महाडिक आघाडीने खातं खोललं, विरोधी गटाकडून फेर मतमोजणीची मागणी

    आतापर्यंतच्या निकालानुसार, सतेज पाटील गटाचे 4  तर महाडिक गटाचा एक उमेदवार विजयी

    सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे चार उमेदवार विजयी

    • सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी
    • अमर पाटील – 436 मतांनी विजयी
    • बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी
    • अंजना रेडेकर –  विजयी

    महाडिक गटाचे उमेदवार 

    महाडिक गटाकडून –  शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी

  • 04 May 2021 12:55 PM (IST)

    Gokul counting resul live : विरोधी आघाडी मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईल : सुजीत मिणचेकर

    राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे कल आता यायला सुरुवात झालीय.. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आले असून यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार सुजित मिणचेकर हे 346 मतांनी विजयी झालेत… मिणचेकर यांच्या रूपाने विरोधी आघाडीने गोकुळ मध्ये आपले खाते खोललय… आरक्षित प्रवर्गातील विरोध या गाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत हाच कल सर्वसाधारण गटात ही राहील आणि विरोधी आघाडी मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईल असा विश्वास सुजीत मिणचेकर यांनी व्यक्त केलाय.

  • 04 May 2021 12:48 PM (IST)

    Gokul Nikal Bayaji Shelke Live : विजयी उमेदवार बयाजी शेळके यांना भावना अनावर

    Gokul Dudh Sangh Result Live :  वार्षिक 2100 कोटीची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा संचालक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक मानाचं पद समजलं जातं.. या पदासाठी तितक्याच ताकतवाण व्यक्तीची वर्णी लागत असल्याचा आज पर्यंत चित्र.. मात्र आज विरोधी आघाडीतून भटके-विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके यांनी 346 मतांनी विजय मिळवला..आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आज गोकुळचा संचालक पदापर्यंत पोचलाय.. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेळके यांना उमेदवारी दिली होती.. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शेळके यांना आपल्या भावना अनावर झाल्या..

    माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सतेज पाटलांनी उमेदवारी दिली. ठरावधारकांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि मला निवडून दिलं, आता गोरगरीब शेतकऱ्याचा आवाज गोकुळमध्ये पोहोचला आहे, अशी प्रतिक्रिया बयाजी शेळके यांनी दिली.

  • 04 May 2021 12:16 PM (IST)

    Gokul Dudh Sangh Result Live : तिसरा कौलही सतेज पाटील गटाला

    कोल्हापूर : गोकुळ निवडणूक मतमोजणीत तिसरा कौलही सतेज पाटील गटाच्या बाजूने, भटक्या विमुक्त प्रवर्गातील बयाजी शेळके 239 मतांनी विजयी.

    त्याआधी माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि अमर पाटील यांची बाजी, आतापर्यंत सतेज पाटील गटाचे तीन उमेदवार विजयी

    सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी

    सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी
    अमर पाटील – 436 मतांनी विजयी
    बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी

  • 04 May 2021 12:13 PM (IST)

    Gukul nikal Live : बंटी पाटलांचे दोन शिलेदार विजयी, महाडिक घटाची धाकधूक वाढली

    गोकुळ निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलची घोडदौड, सतेज पाटील गटाचे उमेदवार सुजीत मिणचेकर 346 मतांनी विजयी, तर अमर पाटील 436 मतांनी विजयी, दोघेही सतेज पाटील गटाचे उमेदवार, विरोधी महाडिक- पी एन पाटील गटाची धाकधूक वाढली

  • 04 May 2021 12:01 PM (IST)

    Gukul Dudh Sangha Result Live : बंटी पाटलांनी खातं उघडलं, सुजीत मिणचेकर विजयी

    गोकुळ दूध संघ मतमोजणीतील पहिला निकाल हाती, सतेज पाटील गटाचे उमेदवार आणि माजी आमदार सुजित मिणचेकर 346 मतांनी विजयी. सत्ताधारी महाडिक-पीएन पाटील गटाची धाकधूक वाढली. सध्या राखीव प्रवर्गातील दोन फेऱ्यांची मतमोजणी झाली असून, अजून दोन फेऱ्या होणार आहेत. राखीव गटातील मतमोजणी झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील मतमोजणीला सुरुवात होईल.

  • 04 May 2021 11:56 AM (IST)

    Gukul Result Satej Patil : दुसऱ्या फेरीतही सतेज पाटील गटाचे 5 उमेदवार आघाडीवर

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत देखील सतेज पाटील गटाचे पाचही उमेदवार आघाडीवर, आरक्षित पाच प्रवर्गातील मत मोजणी सुरू आहे

  • 04 May 2021 11:29 AM (IST)

    Gokul Election Result : विरोधी आघाडीतील पाचही उमेदवार आघाडीवर

    राखीव प्रवर्गातील विरोधी आघाडीतील पाचही उमेदवार आघाडीवर आहेत, महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या शोमिका महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना रेडेकर यांच्यात चुरस

  • 04 May 2021 11:29 AM (IST)

    Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीतील पहिला कल विरोधकांच्या बाजूने

    गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीतील पहिला कल विरोधकांच्या बाजूने लागला, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील बयाजी शेळके आघाडीवर आहेत.