औरंगाबाद : जालना लोकसभेसाठी आपण अजून माघार घेतलेली नाही हे सांगणारे शिवसेने नेते अर्जुन खोतकर वारंवार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं दिसतंय. औरंगाबादेत त्यांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यातच दोन दिवसात खोतकरांबद्दल गुड न्यूज मिळेल, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केलाय. आपण शिवसेनेला कधीही धोका देणार नसल्याचं खोतकरांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. पण त्यांच्या हालचाली सुरुच आहेत.
ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिलंय. त्यामुळे खोतकरांच्या मनात नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडलाय. काही दिवसांपूर्वीच खोतकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले होते. जालन्याच्या जागेवर लवकरच तोडगा निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. शिवाय उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले होते.
खोतकर काय म्हणाले पाहा