मुंबई : नवं शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक नवे निर्णय घेण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय बदलण्यात आलेत. धनगर समाजाबाबतही शिंदे सरकारने नवा निर्णय घेतला आहे. धनगर समाजासाठी जुना निर्णय पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 22 योजना सरकारकडून नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी काही निर्णय घेतले होते. ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आल्या होत्या. पण आता आमचं सरकार सत्तेत आलंय. आताच्या मुक्यमंत्र्यांच्या आदेशाने हे 22 निर्णय सरकारकडून पुन्हा संरचनेत आणण्यात आले आहेत, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
“जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या २२ योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या.त्याआता परत लागू करण्याचे साहेबांनी आदेश दिले आहेत.तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही. जय मल्हार!”, असं ट्विट पडळकर यांनी केलं आहे.
‘जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या २२ योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या.त्याआता परत लागू करण्याचे साहेबांनी आदेश दिले आहेत.तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही.जय मल्हार pic.twitter.com/VA7bWVugtq
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 19, 2022