ठाणे : भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत एक आवाहन राजकीय मंडळींना केलं आहे. पंकजाताई मुंडे यांच्याबाबतीत कुणीही चुकीचं स्टेटमेंट करू नये, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरही पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे इतर पक्षाचे लोक ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्यांच्या विषयी बोलतात. त्या लोकांना माझी विनंती आहे की, पंकजाताईंबाबत त्यांनी संभ्रम पसरवण्याचा चुकीचं काम कोणी करू नये, असं पडळकरांनी म्हटलं आहे.
पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांचं राज्यभर मोठं काम आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सर्व राजकीय नेते आणि लाखो सहकारी येत आहेत. त्यामुळे या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, असं पडळकर म्हणाले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीला राज्याच्या लोकांचं काही घेणं देणं नाही. ते राज्यातल्या कुठल्या प्रश्नावर ती बोलत नाहीत. राज्यातील सत्ता गेल्याने हे फक्त वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे हे रोज महाविकास आघाडीमध्येही एकमेकांवर टीका केली जातेय. यामुळे लोकांनी या महाविकास आघाडीकडे बघायचं, ऐकायचं सुद्धा लोकांनी नाकारलेलं आहे. संजय राऊत काय बोलले, अजित पवार काय बोलले, काँग्रेसचे नेते काय बोलले याकडे लोक जास्त सिरियसली बघत नाही, असं पडळकर म्हणालेत.
गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर एसटी महामंडळाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं. त्यात अटी शिथिल केल्या नसल्याचं त्याचबरोबर महागाई भत्ता जाहीर कराव्या. त्याचबरोबर संपादरम्यान आंदोलनात गैरहजर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अनुपस्थिती नियमित करावी असे प्रामुख्याने मुद्दे होते, असं पडळकर म्हणाले.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या एमडीला मुख्यमंत्र्यांनी योग्य सूचना दिल्या आहेत. काही दिवसात परिपत्रक रद्द करून मागण्या पूर्ण होणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.