Devendra Fadnavis : सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी नवी यादी पाठवण्याच्या हालचाली सुरू, राज्यापाल काय निर्णय घेणार?

| Updated on: Aug 13, 2022 | 8:06 AM

पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. नवे सरकार स्थापन होताच शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने बारा आमदारांची नवी यादी राज्यपालांकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Devendra Fadnavis : सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी नवी यादी पाठवण्याच्या हालचाली सुरू, राज्यापाल काय निर्णय घेणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. नवे सरकार स्थापन होताच शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने बारा आमदारांची नवी यादी राज्यपालांकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्रा आता यावरून विरोधकांकडून नव्या सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. सरकार सत्तेत येऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला, मात्र अद्यापही खाते वाटप झाले नाही तोच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी नव्या नावाची यादी पाठवण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची टीका करण्यात येत आहे. विधान परिषदेवर (Legislative Council) राज्यपाल बारा सदस्यांची नियुक्ती करत असतात. त्यासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने 12 जणांच्या शिफारशीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. मात्र अखेरपर्यंत राज्यापालांनी या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. अखेर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात शिंदे सरकार आले.

राज्यपाल काय निर्णय घेणार ?

राज्यात नवे सरकार येऊन मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र अद्याप खाते वाटप बाकी आहे. खाते वाटप बाकी असतानाच राज्यापाल नियुक्त बारा आमदारांसाठी नव्या नावांची यादी पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यासी यांच्याकडे बारा जणांच्या नावाची यादी देण्यात आली होती. मात्र शेवटपर्यंत आमदारांची नियुक्ती झाली नाही. आता नव्या सरकारने यादी सादर केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांचा सबुरीचा सल्ला

दरम्यान विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधील अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यातील अनेकांनी थेट फडणवीसांकडे फिल्डिंग लावल्याचे देखील बोलले जात आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी बाराशे अर्ज आल्याची माहिती फडणवीस यांनी पनवेलमध्ये पार पडलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिली. मात्र सर्वांनीच आमदारकीसाठी आग्रह धरू नये, संयम ठेवावा असे फडणवीस यांनी म्हटले आहे.