राज्यपाल भाजपच्या शिष्टमंडळाला भेटले, पण महाविकासआघाडीच्या नेत्यांची भेट टाळली?

| Updated on: Mar 25, 2021 | 8:37 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडी सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार होते. | Bhagat Singh Koshyari Mahaviaks Aghadi govt

राज्यपाल भाजपच्या शिष्टमंडळाला भेटले, पण महाविकासआघाडीच्या नेत्यांची भेट टाळली?
राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले आहे.
Follow us on

मुंबई: परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या सगळ्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. कारण, काल भाजपच्या (BJP) नेत्यांना भेट देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकासआघाडीच्या नेत्यांची भेट टाळल्याची चर्चा आहे. राज्यपालांचा उत्तराखंड दौरा नियोजित असला तरी सध्याची परिस्थिती पाहता अनेक उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Governor Bhagat Singh Koshyari will be in Dehradun till 28 March)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडी सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार होते. यावेळी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींसंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून स्वत:ची बाजू मांडली जाणार होती. मात्र, राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले आहे. ते 28 मार्चपर्यंत देहरादूनमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांना आणखी काही काळ राज्यपालांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागणार आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.


कालच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. जवळपास तासभर भाजपचे नेते आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीत भाजपने राष्ट्रपती राजवटीविषयी चर्चा केली की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या सगळ्यानंतर महाविकासआघाडीचे नेते सावध झाले होते. त्यामुळेच महाविकासआघाडीच्या नेत्यांना गुरुवारी राज्यपालांची भेट घ्यायची होती. मात्र, तुर्तास ही भेट लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आगामी तीन दिवसांत काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार का, याकडे सर्वांच्य नजरा लागल्या आहेत.

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली

काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या विमानप्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राजकारण रंगले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 11 फेब्रुवारीला उत्तराखंडला जाणार होते. यासाठी ते सरकारी विमानाने प्रवास करणार होते. मात्र, ठाकरे सरकारने शेवटपर्यंत विमान वापरण्यास परवानगी न दिल्याने राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती.

संबंधित बातम्या:

BJP Delegation Meet Governor | भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, राज्यातील घटनांचा अहवाल कोश्यारींकडे सादर

(Governor Bhagat Singh Koshyari will be in Dehradun till 28 March)