मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा पेच काहीसा सुटत असल्याचे दिसत (Nawab Malik On Mahrashtra Government Formation) आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या बाजूने सरकार स्थापनेच्या शक्यतांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र “राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करुन घ्यायला हवी” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी (Nawab Malik On Mahrashtra Government Formation) केली.
“राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. पण जी प्रक्रिया आता सुरु झाली आहे, ती यापूर्वीही होऊ शकत होती,” असे मत नवाब मलिक यांनी मांडले.
“पण आता राज्यापालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे का याची खातरजमा करणे गरजेचे आहे. अन्यथा या राज्यात घोडेबाजार सुरु होऊ नये यासाठी राज्यपालांनी लक्ष द्यावं,” असेही नवाब मलिक म्हणाले.
तसेच “जर भाजप जर सरकार स्थापन करत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर आम्ही पर्यायी सरकार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु,” असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट (Nawab Malik On Mahrashtra Government Formation) केले.
दरम्यान येत्या 12 नोव्हेंबर 2019 ला सकाळी 11 च्या दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आमदार नवाब मलिक यांनी दिली.
शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 16 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावरुन भांडत आहेत. त्यातच शिवसेनेने आघाडीशी सलगी करत सत्ता स्थापनेचा पर्याय देखील खुला ठेवला आहे. त्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेसचा ‘हात’ ठेवत राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.