मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर 3 आणि शिक्षक मतदारसंघासाठीचा 2 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे ठरणार आहे. (Graduate and Teacher Constituency of Legislative Council Campaigning by many leaders)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यासह अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रचार करणार आहे. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील मतदारसंघासाठी प्रचार करणार आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यासाठी उद्धव ठाकरे झूमद्वारे प्रचारात सहभागी होणार आहेत.
तर अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. तसेच जयंत पाटील हे पुणे विभागाच्या प्रचारासाठी सोलापुरात दाखल झाले आहेत. तर सोलापुरात 5 मंत्री प्रचार करणार आहेत. जयंत पाटील, उदय सामंत, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे प्रचार करत आहेत. (Graduate and Teacher Constituency of Legislative Council Campaigning by many leaders)
तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. अमरावतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचार करणार आहेत. फडणवीस स्वत: मैदानात उतरणार आहेत.
अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) vs राहुल वानखेडे (वंचित) vs नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)
शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) vs सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) vs ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)
श्रीकांत देशपांडे (शिवसेना) vs नितीन धांडे vs दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) vs संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) vs प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )
जयंत आसगावकर (काँग्रेस) vs उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)
(Graduate and Teacher Constituency of Legislative Council Campaigning by many leaders)
संबंधित बातम्या :
पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर