मुंबई : राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Election) जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून (23 डिसेंबर 2020) सुरुवात झाली आहे. राज्यातील 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. 2020-21 च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी, भाजप, मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार, यात शंका नाही. (Gram Panchayat Election Candidate Form Filling Begins)
ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती
1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल
2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल
3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल
4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल
5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार
6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे
7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल
8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार
9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही
10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल
11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये
12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये
13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये
14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट
15. SC-ST, OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट (Gram Panchayat Election Candidate Form Filling Begins)
उमेदवारी अर्ज भरताना काय काय हवे ?
1. उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा
2. अंतिम मतदार यादीत नाव असलेला उतारा
3. उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरवलेले नसावे
4. अपत्य किती आहेत याचे प्रमाणपत्र
5. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र
6. मालमत्ता आणि दायित्वाचे प्रमाणपत्र
7. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र
8. घरी शौचालय असून वापर करत असल्याचे हमीपत्र
9. राखीव जागांवरील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा
10. डिपॉझिटची रक्कम भरल्याचा पुरावा
11. महिला उमेदवारांनी माहेरचे जातप्रमाणपत्र असल्यास 100 रुपयांच्या बाँडवर शपथपत्र
12. टीसी किंवा सनद आदी शैक्षणिक पुरावे
13. आधार आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
14. ग्रामसेवकांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
2020-21 च्या निवडणुकीत कोणते दोन बदल ?
1. सरपंच-उपसरपंचाचे आरक्षण निकालानंतर होणार. 14 फेब्रुवारीच्या आत आरक्षण निश्चिती
2. राखीव जागांवरील उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती वा अर्ज केल्याचा पुरावा पुरेसा
संबंधित बातम्या:
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
(Gram Panchayat Election Candidate Form Filling Begins)