Gram Panchayat Election Result : पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

| Updated on: Nov 06, 2023 | 11:15 AM

अजीत पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर मतदार नेमका कोणाच्या बाजुनं उभा आहे हे या ग्रामपंचायत निवडणूकीत दिसणार होते. त्यामुळे यंदाची ग्राम पंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती यामध्ये पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीत 40 वर्षानंतर सत्तांतर झाले आहे.

Gram Panchayat Election Result : पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?
गुरसाळे ग्रामपंचायत निकाल
Image Credit source: Tv9
Follow us on

पंढरपूर, राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालाची धुळवड सुरू आहे. यंदाची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेती होती, त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांनाही निकालाची प्रतिक्षा आहे. दोन राजकीय पक्षांच्या फुटीनंतर मतदारांचा कौल कोणाकडे आहे हे यावरून स्पष्ट होणार आहे. अशातच  पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये (Pandharpur Gram Panchayat) 40 वर्षानंतर सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिजीत पाटील गटाचे दिपक शिंदे हे विजयी झाले आहे. राष्ट्रवादी एकहाती सत्ता असलेली ही ग्रामपंचायत आता सत्तांतराचा बदल अनुभवणार आहे. राष्टवादीचे आमदार बबन शिंदे गटाला यंदाच्या निवडणूकीत मोठा धक्का बसला आहे.

 मतदारांचा कौल शरद पवार गटाला

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर मतदार शरद पार गटाला पाठींबा देतील की अजीत दादांच्या पाठीशी उभे राहतील हे यंदाच्या निवडणूकीत स्पष्ट होणार होते. ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर आज राज्याभरात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अनेक ग्रामपंचायतीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहिर झाला यात मतदारांनी अजीत पवार गटाच्या बबन शिंदे यांना खो देत शरद पवार गटाच्या दिपक शिंदे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे.

हे सुद्धा वाचा

बारामतीत दादांचेच वर्चस्व

पवार कुटूंबीयांची ओळख असलेल्या बारामतीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. यंदा बारामतीत अजीत पवार गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला आहे. ही निवडणूक शरद पवार आणि अजीत पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेची होती. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत बारामतीकर कोणाच्या बाजूने उभे राहाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अजीत पवार गटाला मिळालेल्या विजयानंतर राजकारणातले चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे 12 पैकी 12 ग्रामपंचायतींवर अजीत पवार गटाने विजय मिळवला आहे.