मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे अशा आशयाचा बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आला आहे. तमराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवाजी पार्कवरील सभेतून मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पण त्यापुर्वी मनसेकडून शिवसेना भवन (Shivsena Bhavan) आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या गुडीपाडव्याच्या बॅनरमधून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.ब्बल 20 फुटाचा बॅनर शिवसेना भवनासमोर मनसेकडून लावण्यात आला आहे. लोकांचं लक्ष वेधून घेत असलेल्या बॅनरची चर्चा आता सुरू झाली आहे. आज मेळाव्यात ते अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर राज ठाकरे आयोध्येला जाणार होते. परंतु कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.
बॅनरमधून शिवसेनेला थेट आवाहन
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाजी पार्क परिसरात केलेल्या बॅनरबाजीमुळे आज ते शिवसेनेला टार्गेट करतील असं वाटतंय. शिवसेनाभवनासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमधून त्यांनी शिवसेनेला थेट आवाहन देखील दिलं आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे मनसेला हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी राजकीय स्पेस मिळाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या मेळाव्यात ते सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका करतील. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा प्रचार मतदारांना भावल्यास राज्यातील आगामी महानरपालिका निवडणुकांमध्ये मनसेच्या मतदारांची संख्या वाढू शकते.
गुढी पाडव्याचं भाषण वादळी ठरणार का ?
गुढी पाढव्याच्या भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक टिझर तयार करण्यात आला आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातलं राज ठाकरेंचं भाषण झालेला आवाज लावण्यात आला आहे. टीझर मधील असं आहे भाषण…आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला, असा आवाज त्याला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा आवाजही टीझरमध्ये पाहायला मिळतोय. हा टिझर बाहेर आल्यापासून याला लाखो लोकांनी पाहिला आहे.