गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, महिला दिव्यांगांसाठी काय विशेष व्यवस्था?, वाचा…

| Updated on: Nov 03, 2022 | 1:37 PM

गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होतेय. वाचा...

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, महिला दिव्यांगांसाठी काय विशेष व्यवस्था?, वाचा...
Follow us on

नवी दिल्ली : गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक (Gujarat Assembly Election 2022) होतेय. ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नुकतंच याची घोषणा केलीय. या विधानसभेच्या निवडणुकीवेळी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महिला तसंच दिव्यांगांच्यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये सध्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे.

महिलांसाठी 1274 विशेष मतदान केंद्र असतील तर अपंगांसाठी 182 विशेष मतदान केंद्र असणार आहेत. एकूण 51 हजार 782 मतदान केंद्र असणार आहेत.

या विधानसभा निवडणुकीत 4.9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 4.6 लाख मतदार युवा आहेत. यंदा ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

यंदाच्या गुजरात निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चेत असणार आहेत. यात शिक्षण, रोजगार, पाटीदारम समाजाचं आरक्षण यासह अन्य मुद्द्ये चर्चेत असतील. यासह रविवारी मोरबी इथं झालेली पूल दुर्घटनाही या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा असणार आहे. 135 जणांचा मृत्यू झाल्याने ही घटना देशभरात चर्चेत राहीली. ही दुर्घटनाही या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.