अहमदाबादः 141 जणांचे प्राण घेणाऱ्या पूल दुर्घटनेमुळे मोरबी (Morbi Constituency) सध्या गुजरातमधील (Gujrat) हॉट सीट बनलंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता कुणाला मत देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पार्टीने (BJP) या मतदार संघातून कांतिलाल अमृतिया यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.
तर काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल जेराजभाई पटेल हे अमृतिया यांच्यासमोर उभे आहेत. आम आदमी पार्टीच्या तिकिटावर पंकज कांतीलाल हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
प्राथमिक फेरीत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपच्या हातून ही जागा जातेय की काय असे दिसून येत आहे. कांग्रेसचे जयंतीलाल जेराजभाई हे 600 मतांनी आघाडीवर आहेत.
29 ऑक्टोबर रोजी मोरबी येथील झुलता पूल कोसळला होता. या दुर्घटनेत १४१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.
ही दुर्घटना घडल्यानंतर भाजपचे कांतिलाल अमृतिया यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं होतं. याचंच बक्षीस म्हणून त्यांना येथून तिकिट देण्यात आलं.
पक्षातील सूत्रांच्या मते, उमेदवारांच्या यादीत आधी कांतिलाल अमृतिया यांचं नाव नव्हतं. मात्र दुर्घटनेवेळी कांतिलाल यांनी मच्छु नदीत बुडणाऱ्या लोकांचे प्राण वाचवले.
त्यामुळे भाजपाकडून त्यांना हे फळ मिळालं. त्यांना आमदारकीचं तिकिट मिळालं. यापूर्वी या जागेवर ब्रजेश मेरजा विजयी झाले होते.
कांतिलाल हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत. 1995मध्ये त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. त्याच वर्षी ते मोरबी येथून निवडणूक लढले आणि विजयीदेखील झाले होते.