धुळे : आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालाशी करणाऱ्या शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अखेर माफी मागितली आहे. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापलं. भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर अखेर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
गुलाबराव पाटील दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले की, ‘भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो’. आज दिवसभर झालेल्या टीकेनंतर पाटील यांनी अखेर धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये बोलताना आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागितली.
दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावे, अशा शब्दात चाकणकर यांनी इशारा दिला होता.
‘गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखरत चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल’, असं ट्वीट करत प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
करतातत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल. (2/2)#Gulabraopatil#MVAGovernment
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 19, 2021
मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या ठिकाणी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकलेत. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी बोदवडमधील रस्त्यावरुन खडसे यांच्यावर टीका केली.
गेली 30 वर्षे ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. तर खडसे यांनीही गुलाबरावांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, गेली 30 वर्षे मी या भागातून निवडून येत आहे. मी कधीच हरलो नाही. काम केल्यामुळेच लोकांनी मला निवडून दिलं आहे. हे पाटलांनाही माहिती आहे, असं खडसे म्हणाले.
इतर बातम्या :