मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चु कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुमचा अमरावती जिल्ह्यातील वाद आहे. तुमच्या स्थानिक वादामुळे राज्यातील 40 आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं आहे.
बच्चु कडू यांनी खोके घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. त्यानंतर बच्चु कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद ताणला गेला आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. गुलाबराव पाटील यानीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात अफवांच पिक चालू झाल आहे. माझं आव्हान आहे की, तुमचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं 90 दिवसाची तुलना करू तुम्ही वरचढ ठरलात तर हे सरकार खुर्ची खाली करेल, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
आताचे मुख्यमंत्री हात दाखवा आणि गाडी थांबा असे मुख्यमंत्री आहेत. काही लोक आमाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. परंतु आम्ही त्यांना कामातून उत्तर देणार, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
कर्नाटकमध्ये पैसे मिळेल, त्यासाठी गाडी आणली होती. मग आमच्या 50 खोक्यांसाठी कोणता ट्रक आणला होता सांगा, असंही पाटील म्हणालेत.
दरम्यान बच्चु कडू यांनी या सगळ्या प्रकरणानंतर इशारा दिला आहे.मी आता आमदार आहे. आधी मंत्रीही होतो. असल्या पदांचा मला लोभ नाही. असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो. आम्ही रस्त्यावर उतरू तेव्हा राजीनामा आमच्या हातात असेल. तेव्हाचा बच्चु कडू काही औरच असेल, असं बच्चु कडू म्हणालेत.