अनिल केऱ्हाळे, जळगाव : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. पण उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा होणार आहे, अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदेगटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत. मधल्या काळात आम्ही हिंदुत्वाच्या विचार सोडून दुसऱ्या ट्रॅकला गेलो होतो. पण आता पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांसाठी भगवा झेंडा आम्ही हाती घेतला आहे, असं म्हणत त्यांनी आपला अजेंडा स्पष्ट केलाय.