मुंबई : मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर देसाईंनी शिवबंधन हाती बांधले. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. (Gurudas Kamat Newphew BJP Leader Sameer Desai joins Shivsena)
समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते.
काँग्रेसमधून त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाईंचा भाजपप्रवेश झाला होता. प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपचं सचिवपद देण्यात आलं होतं. मात्र आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा अवधी उरला असताना शिवसेनेत आता इनकमिंग सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे ऑगस्ट 2018 मध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती.
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुदास कामत यांनी निधनाच्या वर्षभर आधी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या गुरुदास कामतांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली होती. (Gurudas Kamat Newphew BJP Leader Sameer Desai joins Shivsena)
1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश
1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव
संबंधित बातम्या :
मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?
Special Story | काँग्रेसमधील गटबाजी संपली का?; वस्तुस्थिती काय?
(Gurudas Kamat Newphew BJP Leader Sameer Desai joins Shivsena)