मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुन्हा चर्चेला उधाण!

| Updated on: Oct 22, 2022 | 12:18 PM

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुन्हा चर्चेला उधाण!
Follow us on

मुंबई : राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी अमित शाह (Amit Shah) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा झाली होती. आता मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने पुन्हा एकदा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

‘मा. गृहमंत्री श्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो’ असं मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मिलींद नार्वेकरांच्या या शुभेच्छा संदेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

दरम्यान यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांचे अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत.  मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर हे नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील कोण जाईल हे सांगता येत नाही. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे, फडणवीस, शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी मुंबई महापालिकेत मनसे युतीत सहभागी होणार का? यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीनिमित्त एकनाथजी, देवेंद्रजी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं. मनसे बाबत पक्षश्रेष्टी काय तो निर्णय घेतील असं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई महापालिकेत यावेळी भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वासही यावेळी महाजन यांनी व्यक्त केला आहे.