RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर झळकवला तिरंगा, विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर?

| Updated on: Aug 13, 2022 | 1:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते, विरोधी पक्षातील नेते, कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता. मात्र, आता संघाने ट्विटर, फेसबुकसह आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला आहे.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर झळकवला तिरंगा, विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर?
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचं महत्वाकांक्षी अभियान ‘हर घर तिरंगा’ देशपातळीवर राबवलं जात आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते, विरोधी पक्षातील नेते, कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media Account) तिरंगा लावला. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता. मात्र, आता संघाने ट्विटर, फेसबुकसह आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघ परिवाराने कृतीतून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

मोहन भागवतांच्या ट्विटरचा डीपीही तिरंगा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सर्व सोशल मीडिया उकाऊंटच्या डीपीवर तिरंगा लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटच्या डीपीवर तिरंगा ठेवला आहे. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह दत्तात्र होसबळे यांनीही आपला डीपी तिरंगा ठेवला आहे. तसंच मनमोहन वैद्य आणि अरुण कुणार यांनीही आपला डीपी बदलला आहे.

मोहन भागवत यांनी ट्विटर अकाऊंच्या डीपीवर तिरंगा लावला

राहुल गांधींनी उचलला होता संघाचा मुद्दा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. 52 वर्षे संघाने आपल्या मुख्यालयावर तिरंगा का फडकवला नाही? खादीचे राष्ट्रध्वज बवणाऱ्यांपासून जगण्याचं साधन का हिरावलं जात आहे? चीनकडून मशीन निर्मित आणि पॉलिस्टरचे झेंडे आयात करण्याला परवानगी का देण्यात आली? असे सवाल राहुल गांधी यांना विचारले होते. तसंच आरएसएसने आपल्या मुख्यालयावर 52 वर्षात कधी तिरंगा फडवला नाही आणि आता ढोंग रचलं जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

पंतप्रधान मोदींचं मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा लावून हर घर तिरंगा ही मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे. ही मोहीम तिरंग्यासोबत असलेलं आपलं अधिक दृढ बनवेल. तर त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये उल्लेख केला की 22 जुलै 1947 लाच तिरंग्याला आपला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली.

 

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!