नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं हीन दर्जाचं वक्तव्य करत शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना, असं अपमानजनक वक्तव्य हरयाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी केलं आहे. (Hariyana Agriculture Minister J P Dalal Contravercial Statement on Delhi Farmer Protest)
राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर गेली अडीज महिने शेतकरी ऊन वारा पाऊस झेलतो आहे. सरकारविरोधात संघर्ष करतो आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी शेतकरी लढतो आहे. हाच सगळा संघर्ष सुरु असताना काही शेतकरी धारातिर्थी पडले. यांचा अपमान करत शेतकरी आंदोलनाची खिल्ली हरयाणाचे कृषिमंत्र्यांनी उडवली आहे.
शेतकरी आंदोलनात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. पण मला वाटतं संबंधित शेतकरी त्यांच्या घरी असते तरी त्यांचा मृत्यू झालाच असता. त्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं ते म्हणाले.
दलाल यांनी शेतकरी आंदोलनावर अपमानजनक टिप्पणी केल्यानंतर देशभरातील शेतकरी नेत्यांनी तसंच चळवळीतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्वत्र निषेधाचा सूर निघाल्याने माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.
केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी देशभरातले शेतकरी नवी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. गेली अडीज महिने शेतकरी कशाचीही पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी लढत आहे. या लढाईत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागलेत.
आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलाय. याच पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी सरकारने आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे.
(Hariyana Agriculture Minister J P Dalal Contravercial Statement on Delhi Farmer Protest)
हे ही वाचा :
बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक, महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारचा बुरखा फाडला; सामनातून मोदींवर टीकेचे बाण
मोदीजी देशभक्त आणि राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा, प्रियांका गांधी कडाडल्या