Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पराभव हा अनेकांच्या विजयापेक्षा भारी ठरलाय का? फेसबुकवरची ही पोस्ट वाचा

| Updated on: Jun 30, 2022 | 10:22 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना काल केलेलं फेसबूक लाईव्ह प्रभावी ठरलं. सोशल मीडियावर देखील उद्धव ठाकरेंच्या फेसबूक लाईव्हवर लिहिलं जातंय. अशीच एक फेसबूक पोस्ट ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांनी लिहिली आहे. पण, ही पोस्ट त्याचा राजकीय अर्थ, पक्ष, राजकारण यापेक्षा थोडा वेगळा विचार करण्याची कल्पना देऊन जाते.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पराभव हा अनेकांच्या विजयापेक्षा भारी ठरलाय का? फेसबुकवरची ही पोस्ट वाचा
उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर कालच (बुधवारी) रात्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेत बंडखोर एकनाथ शिंदे गट निर्माण झाल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यामुळे उद्धव ठाकरे यांना याचा मोठा धक्का बसल्याचं बोललं गेलं. त्यानंतर एक-एक आमदार आणि मंत्रीही बंडखोर गटात सहभागी झाले. उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या फेसबूक लाईव्हमध्ये देखील ‘माझ्याबरोबर फक्त चार मंत्री होते, असं भावनिक होऊन अवघ्या महाराष्ट्राला सांगितलं. या सत्तासंघर्षात कुणाला अपयश आलं किंवा कुणाला विजय मिळाला. यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी केलेलं शेवटचं भाषण मात्र प्रभावी ठरलं. यावर अनेक विचारवंत, लेखक, विश्लेषक आणि जाणकार आपली वेगवेगळी मतं मांडतायत. सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या भाषणावर लिहिलं जातंय. अशीच एक पोस्ट ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांनी लिहिली आहे. पण, ही पोस्ट राजकीय अर्थ वगैरे किंवा पक्ष, राजकारण, यापेक्षा थोडी वेगळा विचार करण्याची कल्पना आपल्याला देऊन जाते.

संजय आवटे यांची फेसबूक पोस्ट

 

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा. पक्ष वगैरे विसरा. पण, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं. त्याही स्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं, आजच्या पोरांच्या भाषेत कसं ‘कुल’ राहावं, यासाठी हे भाषण बघू द्या त्यांना.आयुष्यात कधीतरी तुमच्या मुलाबाळांना हे उपयोगी पडेल.- संजय आवटे’