सांगली – इस्लामपूर (islampur) मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील (rajarambhapu patil) यांच्या पुतळयाचे अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तिथं हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात बोलत असताना हसन मुश्रीफ म्हणाले की बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत असं वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. तसेच हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीतील अनेक आठवणी कार्यकर्त्यांच्यासमोर खुल्या मनाने मांडल्या. काल झालेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे वाळवा तालुक्यातील अनेक अधिकारी तिथं झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आठवणी
जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित सगळ्या मान्यवरांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सभेत बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्ततेत कसे आलो याचा किस्सा सांगताना बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत हे वक्तव्य केल्यानंतर तिथं उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला आणि कार्यकर्ते देखील खूष झाले.
चारोळीची शिराळा, वाळवा, इस्लापूर भागात चर्चा
पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण होणार असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते इस्लापूरमध्य्ये आले होते. जयंत पाटलांच्या प्रत्येक कार्यक्रमाला वाळवा, शिराळा आणि इस्लापूर या परिसरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहतात. हसन मुश्रीफ यांनी बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत हे वक्तव्य केल्यानंतर त्यांची चर्चा शिराळा वाळवा आणि इस्लापूरात होती. राजकीय नेत्यांनी अशी वक्तव्य केली की, ती कार्यकर्त्यांना अत्यंत आवडत असतात. तसेच अशी वाक्य अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे., त्याचबरोबर शेजारी वाळवा तालुक्यात सुध्दा राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.