नवी मुंबई : (Rebellion from Shiv Sena) शिवसेनेतून बंड केलेल्या आमदार अन् खासदारांवर आतापर्यंत सेनेतील आमदारांपासून ते पक्षप्रमुखांपर्यंत सर्वांनी टीकास्त्र सोडले आहे. पण (Rebel MLA) बंडखोर आमदारांचा खरा भांडाफोड केला आहे ते शिवसेनेचे (Nitin Bangude) उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी. नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे आयोजित कार्यक्रमात भाजपाची खेळी आणि बंडखोर आमदारांचे स्वार्थ यामागे कसे होते याचा पाढाच वाचून दाखवला आहे. तर या बंडामुळे शिवसेनेचे एक टवकाही उडालेला नाही. जे गेले ते कावळे म्हणत शिवसेने पक्ष उभारणीसाठी आवश्यक असलेले बियाणे हे शिवसैंनिकारुपी कायम आहे.आदीच नांदायचा कंटाळा, त्यात माहेरचा सांगावा अशी बंडखोरांची अवस्था झाली त्यामुळेच त्यांनी ही गद्दारी केल्याचा आरोप बानगुडे यांनी केला आहे. हिंदूत्व, राष्ट्रवादीशी दुजाभाव, राज्याचा विकास हे केवळ सांगण्यासाठी चांगले आहे.मात्र, या बंडामागे होता तो स्वार्थ असे म्हणत त्यांनी बंडखोर आमदरांचे सर्व आरोप तर खोडून काढलेच पण भविष्यात शिवसेना कशी उभारी घेईल हे सुद्धा पटवून सांगितले आहे. त्यामुळे बानगुडे यांचे हे भाषण आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यापासून ते संतोष बांगर इथपर्यंत अनेकांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. मात्र, त्यांच्या या कारणांना नितीन बानगुडे यांनी चोख उत्तर देऊन बंडखोरांचा नेमका उद्देश काय हे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीमुळे बंड केले तर मग, कुणाबरोबर गेलात ज्यांनी पहाटेच्या वेळी शपथविधी त्यांच्याबरोबर केला म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले तर शिवसेना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असे म्हणता तर मग भाजपाचे अध्यक्ष हेच शिवसेना आता संपल्यात जमा असे विधान का करतात? असा सवाल बानगुडे यांनी उपस्थित केला. हे बंड केवळ भाजपाच्या सांगण्यावरुच यांनी केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेच्या राजकारणाला काही प्रमाणात धक्का बसला असेल पण समाजकारणापासून शिवसेना कधीच दूर जाऊ शकत नाही. शिवसेना कशी टिकणार याबाबत बानगुडे यांनी दिलेले उदाहण खूप समर्पक आहे. ते म्हणाले की, शेतकरी कष्टाने पेरणी करतो पण पेरलेले सर्वच त्याच्या पदरी पडेल असे नाही. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ या अशा संकाटामुळे धोका हा राहतोच. पण शेतकरी खचत नाही, कारण त्याला माहिती आहे की, आपल्या घरात बियाणे हे शिल्लक आहे ते. त्यामुळे जोपर्यंत बियाणे आहे तोपर्यंत हजार वेळा पेरणी करता येईल आणि एक दाणा पेरला तर त्यामधून हजार जण उगवतील. अशीच वाटचाल आता शिवसेनेची राहणार आहे. उर्वरित सेनेचा विस्तारही करतील आणि पुर्वीपेक्षा चांगले दिवस येतील असा त्यांनी विश्वास दिला.
क्रांतीसाठी अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात असले तरी खरे कारण आता जनतेपासून लपून राहिलेले नाही. पाठीत खंजीर खूपसून बडेजाव करण्यामध्ये काही अर्थ नाही. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी झालेले बंड असल्याचा आरोप बानगुडे यांनी तर केलाच पण विश्वासघाताने उभे केलेले इमले फार काळ राहणार असे म्हणत हे सरकार अधिक दिवस टिकणार नसल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.