परभणी : उद्धव ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी आज बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच प्रहार केला. आदित्य ठाकरे यांनी आज बांधावर जाऊन दौरा केला. त्यावेळी त्यांनी कुठं गेले कृषिमंत्री असा सवाल विचारला. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ज्याला बाण समजतं त्याला बांध समजलं. त्यांनी स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही. बांध कसा ठेवू शकतात, असा प्रतिसवाल केला.
अब्दुल सत्तार म्हणाले,मला वाटतं, घरात चॉकलेट खाणं वेगळं, काम्प्युटरवर बसणं वेगळं आणि जमिनीवर या गाऱ्यात फिरणं वेगळं आहे. जे फिरलं जे बोललं. आमच्याकडं उद्धव ठाकरे हे औरंगाबादला आले. त्यांचं अडीच तासाचं नियोजन. त्याच्यात 24 मिनिटं पाहणी. काय 24 मिनिटात महाराष्ट्राची पाहणी करू शकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावं बाण कोणतं आहे. काम कोणतं आहे आणि बांध कुठं आहे. अशी फिरकी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची घेतली.