ठेचा लागून माणसं शहाणी होतात, पार्थच्या अडखळलेल्या भाषणावर पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावर अनेक प्रतिक्रिया आल्या. पहिल्यांदाच आजोबा आणि वडिलांसमोर भाषण करताना अडखळले आणि यामुळे थेट पवार घराण्यालाच स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. यावर आता शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ठेचा लागून माणसं शहाणी होतात, असं ते म्हणाले. बारामतीत […]

ठेचा लागून माणसं शहाणी होतात, पार्थच्या अडखळलेल्या भाषणावर पवारांची प्रतिक्रिया
Follow us on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावर अनेक प्रतिक्रिया आल्या. पहिल्यांदाच आजोबा आणि वडिलांसमोर भाषण करताना अडखळले आणि यामुळे थेट पवार घराण्यालाच स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. यावर आता शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ठेचा लागून माणसं शहाणी होतात, असं ते म्हणाले.

बारामतीत शरद पवारांना पार्थबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “पार्थ पवारला भाषणाबाबत काहीही सल्ला देणार नाही. सुरुवातीला ठेचा लागतात. नंतर माणसं शहाणी होतात”. पार्थ पवारांच्या प्रचारासाठी मावळमध्ये सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचं पहिलं भाषण झालं. लिहून आणलेलं भाषणही न वाचता आल्यामुळे पार्थ पवारांची गोची झाली होती.

पार्थ पवारांचं भाषण