मुंबई : असं म्हणतात की एखाद्याच्या स्वभावावर हाफकिनही लस शोधू शकत नाही, तसंच झालंय शिंदेसाहेबांच्या (Eknath Shinde) मंत्र्यांचं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अज्ञानावरही आता हेच म्हणायची वेळ आली आहे की, हाफकीनही यांच्या अज्ञानावर लस शोधू शकले नसते.खरं तर तानाजी (Tanaji Sawant) सावंत ज्या हाफकीनवर बंदी टाकायला जात होते, तो माणूस नसून संस्था आहे, असं पीएने सांगितल्याने त्या संस्थेवरची बंदी वाचली आहे असं म्हणावं लागेल. आता राज्यभरचर्चा सुरु झाली आहे, यांच्या अज्ञानावर कुणी लस शोधेल का लस? कारण आरोग्यमंत्र्यांना हाफकिन (Haffkine) माहित नाही?, हाफकिन यांच्या अज्ञानावर लस शोधायला तुम्ही पुन्हा जन्माला या? असंच म्हणावं लागेल.
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेतल्यापासून शिंदे गटातील अनेक आमदारांचे किस्से उघडकीस येत आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयात काल (Pune Sassoon Hospital) आरोग्य मंत्र्यांचं अज्ञान पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर उघडकीस आले आहे. एका वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीत हा किस्सा सांगण्यात आला आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल भेट दिल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना काही सूचना दिल्या.
औषधांचा तुटवडा पडत असल्याने तुम्ही ज्या हाफकिन माणसाकडून औषध घेत आहात ते आधी बंद करा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना झापलं आहे.
वास्तविक पाहाता, हाफकीन नावाची एक संस्था मुंबईत आहे, हाफकीन आडनाव असलेल्या एका शास्त्रज्ञाच्या नावावर या संस्थेला हे नाव देण्यात आले आहे. वाल्डमेर मोर्डेकई हाफकिन यांनी प्लेग आणि कॉलरा या आजारांवर लस शोधून काढली.
मुंबईत त्यांचं संशोधन आणि वास्तव्य मुंबई ग्रँड हॉस्पिटलला होतं, त्यांची येथे प्रयोगशाळा होती, ते मुंबईत १८९६ मध्ये आले होते. १९२५ साली या संस्थेचं नाव बदलून हाफकिन इन्स्टीट्यूट करण्यात आलं.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांच्या अज्ञानामुळे ट्रोल होऊ लागले आहेत. या आधी त्यांचा घर ते ऑफिस, ऑफिस ते घर हा दौराही चांगलाच गाजला होता. pic.twitter.com/D4x39K2wyp
— Vaishnavi Karanjkar (@vaishnavikaran4) September 5, 2022
याच हाफकिन संस्थेकडे कोणतीही औषधं, जी सरकारी रुग्णालयात लागतात, ती खरेदी करण्याची परवानगी घ्यावी लागते,यानंतर ही औषधं सरकारी रुग्णालयात उपलब्ध होतात, तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ज्या हाफकीन माणसाकडून औषध नाकारायाचं आहे,त्यांचा मृत्यू १९३० सालीच झाला आहे.
ज्यावेळी आरोग्य मंत्री तिथल्या अधिकाऱ्यांना ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या त्यांच्या पीएनी त्यांच्या कानात हाफकिन ही संस्था असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी तिथून पळ काढला अशी बातमी छापून आली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या अज्ञानाची सगळीकडे चर्चा आहे.
त्या बातमीचं कात्रण सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालं आहे. तसेच नागरिक आरोग्य मंत्र्यांच्या अज्ञानाची धिंड काढताना दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तुमच्या अज्ञानात भर घाला अशी कमेंट केली आहे.
राज्याचे नवे कृषी मंत्री हे पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथं अमृत देशमुख यांनी सोयाबिन खोड किडीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु अब्दुल सत्तार यांनी त्यांचं काहीही ऐकून न गडबडीत निघून गेले. हा देखील किस्सा राज्यात अधिक गाजला होता.