सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना (MP Jay Siddheshwar Swami Issue) उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जातपडताळणी समितीकडून शिवाचार्य यांचं जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे. तसेच, (MP Jay Siddheshwar Swami Issue) न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावरील सोलापूर जात पडताळणी समितीने दिलेला निकाल रद्द करत त्यावर स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करुन अहवाल देण्याबाबत उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे. (MP Jay Siddheshwar Swami Issue)
खासदारकी वाचवण्यासाठी धडपड
सोलापूरचे भाजपचे खासदार (MP Jay Siddheshwar Swami Issue) डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे.
त्यानंतर खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली होती. अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली.
सोलापूर लोकसभा निवडणूक
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य (MP Jay Siddheshwar Swami Issue) मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.
संबंधित बातम्या :
विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटावर काँग्रेसचा माजी आमदार
गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, भाजपचे राज्यसभा उमेदवार भागवत कराड कोण आहेत?
काँग्रेस रिटर्न प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेचं तिकीट, खैरे, रावतेंना डावललं
संजय काकडेंचा पत्ता कट, खडसेंनाही तिकीट नाही, राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी