पुणे : जेम्स लेनचं (James Laine) गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बुधवारी उत्तर दिले. त्यानंतर हे प्रकरण अधीकच तापत चाललेल दिसत आहे. यादरम्यान जेम्स लेन प्रकरणावर इतिहासकार पांडुरंग बलकवडे (Historian Pandurang Balkawade) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी, इतिहासकार म्हणून आम्ही हे पुस्तक अभ्यासल्याचे म्हटले आहे. तसेच जेम्स लेन याने जिजाबाई, शहाजी राजे यांच्याबाबत अनैतिहासिक, बदनामी करणारी विधानं या पुस्तकात केली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.
जेम्स लेन याच्या पुस्तकावरून सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता आरोप-प्रत्यारोपात इतिहासकारांनी देखील उडी घेतली आहे. याप्रकरणी इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी, लेन याचे ते पुस्तक वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. या पुस्तकात जिजाबाई, शहाजी राजे यांच्याबाबत अनैतिहासिक, बदनामी करणारी विधानं लेन याने केली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त आहे. जेम्स लेन याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते पुस्तक लिहिलं. पण जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाने कसं काय हे पुस्तक लिहून घेतलं असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे याबाबत आम्ही निषेध केला. तसेच 10 नोव्हेंबर 2003 रोजी ऑक्सफर्डचे दिल्लीतील जे कार्यालय आहे तिथे आम्ही पत्र पाठवलं आणि पुस्तकावर बंदी आणावी याबाबत मागणी होती असं इतिहासकार बलकवडे यांनी म्हटलं आहे. यानंतर इतिहासकार बलकवडे यांनी, ऑक्सफर्डने लेन याच्या ‘त्या’ पुस्तकाप्रकरणी माफी मागितली आणि पुस्तक मागे घेत असल्याचे कळवल्याचेही कळवले. मात्र ज्या प्रति वितरित झाल्या आहे त्यातून चुकीचा इतिहास पोहचू नये असं वाटतं असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं.
संभाजी ब्रिगेडच्या भुमिकेवर बोलताना, इतिहासकार बलकवडे म्हणाले की, ज्या प्रति वितरित झाल्या त्यातील काही संभाजी ब्रिगेडने ही घेतल्या असाव्यात. त्यांनी त्या पुस्तकातील जो परिच्छेद चुकीचा होता तोच परिच्छेद नेमका घराघरात पोहोचवला.
लेनच्या त्या वादग्रस्त पुस्तकावरून त्यावेळी राज्यात वादंग माजले होते. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. तर हायकोर्टातही याप्रकरणी सुनावणी सुरू होती. त्यावेळी काँग्रेसने हायकोर्टात योग्य प्रकारे बाजू मांडली नाही. किंवा पत्रही पोहचवले नाही. त्यामुळे या पुस्तकावरील बंदी उठल्याचेही इतिहासकार बलकवडे म्हणाले.
जेम्स लेन याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते पुस्तक लिहिलं. तसेच त्यांने जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं सांगितलं असं पवार म्हणातात, मग जेम्स लेन ला भारतात का आनलं नाही. त्याला भारतात बोलावून त्याच्याकडून माहिती घेणे अपेक्षित होते. तर बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव याप्रकरणात घेतले जात आहे. त्यांची हकनाक बदनामी केली जात आहे.
शरद पवार आत्ता का याच राजकारण करतायेत हे माहिती नाही. पण आपली पवारांना विनंती आहे की, त्यांनी यावर अशा पध्दतीने राजकारण करू नये. बाबासाहेब पुरंदरे या ऋषितुल्य व्यक्तीची बदनामी करु नये.