मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख (Anil Deshmukh Tweet) यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे. (Home Minister Anil Deshmukh tweet On Thackeray government investigated by retired judges Allegations by Parambir Singh)
परमबीर सिंग यांनी यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे वादळ उठलं होतं. ते वादळ अजूनही घोंघावत आहे. भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांना क्लीन चिट देत चौकशीची किंवा राजीनाम्याचीही गरज नसल्याचं सांगितलं. पण बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केलं. “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते”, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
सत्यमेव जयते… pic.twitter.com/f2oJjFhO8A— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबत लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकारची बाजू राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मांडली जाणार आहेत. तत्पूर्वी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यातील सर्व प्रकरणाबाबत राज्य सरकारकडून तातडीने अहवाल मागवण्याची मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.
(Home Minister Anil Deshmukh tweet On Thackeray government investigated by retired judges Allegations by Parambir Singh)
हे ही वाचा :
Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…