मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची आत्मकथा असलेलं ‘Rakesh Maria – let me say it now’ हे पुस्तक सध्या चर्चेचा विषय (Rakesh Maria book controversy) बनलं आहे. या पुस्तकातून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या पुस्तकामध्ये शीना बोरा हत्याकांड प्रकरणात दोन वरिष्ठ आय.पी.एस अधिकाऱ्यांवर माहिती लपवण्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून हा वाद सध्या गृह विभागाकडे पोहोचला आहे.
मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या अचानक झालेल्या बदलीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ‘Let Me Say It Now’ या पुस्तकात राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातील सहकारी असलेले तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण माहितीपासून लांब ठेवले.
“देवेन भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली. शीना बोरा बेपत्ता झाल्याबाबत मी जेव्हा पीटर मुखर्जीला विचारलं. तेव्हा पीटरने आपण याबाबतची माहिती देवेन भारती यांना दिली होती, असं सांगितलं. शीना बेपत्ता झाल्यासंदर्भात तक्रार किंवा आकस्मिक मृत्यूची नोंद का झाली नाही याबद्दल जेव्हा चर्चा केली तेव्हा देवेन भारती गप्प बसले. यानंतर मी देवेन भारती यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं, असंही या पुस्तकात म्हटलं (Rakesh Maria book controversy) आहे.
देवेन भारती यांनी माहिती लपवली. तर पोलीस अधिकारी जावेद अहमद यांना पीटर मुखर्जीबाबत माहित होतं की काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान या पुस्तकाचे प्रकाशन अद्याप झालेलं नाही. पण पुस्तकातील मजकूरावरुन वाद सुरु झाला आहे.
राकेश मारिया सारखा व्यक्ती जेव्हा बोलतो. तर त्यात नक्कीच काही तरी तथ्य असणार, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
या प्रकरणी मी कुठलीही माहिती लपवलेली नाही. ही सर्व माहिती पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. राकेश मारियाचे कुटुंबीय बॉलिवूडशी संबंधित आहे. त्यामुळे पुस्तकाच्या मार्केटींगसाठी त्यांनी हे केलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेन भारती यांनी दिली (Rakesh Maria book controversy) आहे.
शीना बोरा प्रकरण चर्चेत आल्यानंतर राकेश मारियांना प्रमोशन देत होमगार्डच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली होती. राज्याचे सरकार बदलल्याने त्यांची बदल केली असावी असं बोललं जात होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शीना बोरा हत्या प्रकरणातील चौकशीमुळे नाखूष होते. त्यांना पीटर मुखर्जीबद्दल फार काळ माहित नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मात्र सध्या या प्रकरणाची योग्य माहिती घेऊन गृह विभाग योग्य ते पाऊल उचलेल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
शीना बोरा प्रकरणी तपास सुरु असून मात्र राकेश मारियांच्या पुस्तकाच्या माध्यमातून हे प्रकरण सध्या पुन्हा चर्चेत आले आहे. त्याचबरोबर पोलीस खात्यात ही गटबाजी आणि राजकारण असते, हेही समोर येत (Rakesh Maria book controversy) आहे.
संबंधित बातम्या :
शीना बोरा हत्या प्रकरण : राकेश मारियांच्या पुस्तकात गौप्यस्फोट, देवेन भारतींचं उत्तर