नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) सोशल मीडियावर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. एका वृत्तवाहिनीच्या डिबेट शो दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ (Congress spokesperson Gourav Vallabh) यांनी संबित पात्रा यांना ट्रिलियनमध्ये किती शून्य (Number Of Zeroes In A Trillion) असतात? असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाचे उत्तर संबित पात्रांना न आल्याने त्यांना ट्रोलर्सने चांगलंच ट्रोल केलं आहे. संबित पात्रा यांच्या नावाचा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे यावरुन काँग्रेस नेत्या प्रियाका गांधी यांनीही संबित पात्रा यांच्यावर टीका (Priyanka Gandhi Trolls Sambit Patra) केली आहे.
एका वृत्तवाहिनीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह डिबेट शो चे आयोजन केले होते. यात डिबेट शोमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Gourav Vallabh VS Sambit Patra) यांच्यासह अन्य दिग्गज सहभागी झाले होते.
Video Courtesy : ABP news pic.twitter.com/YEKmjcHV9N
— Arun (@ArunMolasi) September 14, 2019
“भाजप सरकार नेहमी 5 ट्रिलियन डॉलरची घोषणा करत असते, तर संबित पात्रा तुम्ही जर पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात (Number Of Zeroes In A Trillion) हे सांगू शकता का?” असा प्रश्न या डिबेट शो दरम्यान काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी संबित पात्रांना विचारला. त्यानंतर या प्रश्नावरुन दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. त्यावेळी संबित पात्रांनी “तुम्ही याबाबत राहुल गांधींना विचारा”, असे गौरव वल्लभ (Gourav Vallabh VS Sambit Patra) यांना सांगितले.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वत:ला तरी माहीत आहे का असा प्रश्न संबित पात्रांनी उपस्थित केला. त्यावेळी गौरव वल्लभ यांनी 5 ट्रिलियनमध्ये 12 शून्य असतात असे उत्तर दिले.
दरम्यान या वृत्तवाहिनीवरील टीव्ही शो चा हा व्हिडीओ ट्विटरवर फार ट्रेंड होत आहे. त्यानंतर प्रियांका गांधींनी याचा एक स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना, “मी राहुल गांधी नाही ज्यांना शून्याव्यतिरिक्त काहीही माहिती नाही किंवा मी रॉबर्ट वाड्रा आहे जो फक्त शून्याचा वापर आपला खजिना भरण्यासाठी ओळखला जातो.”
Hmm ..But @priyankagandhi Ji I am neither Rahul Gandhi who knows “Zero” about anything nor am I MR Vadra who knows only about “zeros” to fill his coffers
By the way Has MR Vadra answered the ED as to how may Zeros he has pocketed or is he on his way to join Mr Chidambaram? pic.twitter.com/rQ38Te6Hdu— Sambit Patra (@sambitswaraj) September 14, 2019
मिस्टर वाड्रा यांनी ईडीला सांगितले की त्यांच्या खिशात किती शून्य असतात आणि ते चिदंबरम यांच्या चौकशीत सामील करणार आहेत का? असा प्रश्नही त्यांनी प्रियांका यांना विचारला.
दरम्यान या संपूर्ण प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ट्विटरवर #SambitPatra हे ट्रेंडही होत आहे.