नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर (Yogi Adityanath Mumbai Daura) येत आहेत. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. माजी खासदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राने चांगल्या सुविधा दिल्या आहेत. महाराष्ट्रातून उद्योग नेण्यापेक्षा तुमच्या राज्यात नवीन उद्योग निर्माण करा. नवे उद्याग येण्यासाठी वातावरण तयार करा, असं दलवाई म्हणालेत.
रोज धर्माच्या गोष्टी करण्याऐवजी भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी जरा मॉर्डन व्हा. आधुनिक व्हा. उद्योग हे आधुनिकतेत येतात. ते आधुनिक विचार घ्या तरच उद्योग उच्चर प्रेदशमध्ये येतील, असं हुसेन दलवाई म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येत आहेत.थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील. उद्योग जगतातील बड्या हस्तींसोबत त्यांची चर्चा होणार आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी आता जोर धरत आहे. आमचं सरकार असताना हा प्रश्न आम्ही दिल्लीत मांडला होता. आपली मुलं मराठी भाषेच्या शाळेत शिकतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पाट्या मराठी करून होणार नाही. आताचे राज्य सरकार अस्तित्वात आहे का?, असा सवाल हुसेन दलवाई यांनी केली आहे.
दरम्यान ‘मराठी तितुका मेळवावा’ हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे.त्यावर बोलतानाच मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावर भाष्य केलंय. “‘मराठी तितुका मेळवावा’ हे विश्व संमेलन घेण्या मागचं उद्देश्य हाच आहे की ज्यांनी मराठी भाषा आंतराष्ट्रीय पातळीवर टिकवली त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देता यावं. यामुळे मराठी भाषा आणि महाराष्ट्रात हित जोपासलं जाईल याची मला खात्री आहे. अभिजात दर्जा मिळवणं ही वेगळी आणि टेक्नीकल बाब आहे. आम्हाला असे अनेक नवीन पुरावे मिळालेत. हे संम्मेलन घेण्याचा उद्देश आहे की ज्यांनी भाषा टीकवली त्यांना एकत्र आणणं”, असं केसरकर म्हणालेत.
सरकारचं धोरणच असं आहे की धार्मिक स्थळाचं पर्यटन स्थळ केली जात आहे. उत्तर प्रदेशमध्येही असंच होत आहे. आम्ही जैन समाजासोबत आहोत. जैन समाजाने इतर समाजावर हल्ले होत असताना शांत राहू नये, असंही दलवाई म्हणालेत.