मी फोकनाड लीडर नाही : नितीन गडकरी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नागपूर: ‘मी फोकनाड लीडर नाही, मी जे म्हणतो ते करुन दाखवतो’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः केलेल्या विकास कामाच्या दाव्यांबद्दल रोखठोक विधान केलं आहे. बंजारा समाजाच्या वतीने नागपुरात बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांसाठी पूरक धंदा म्हणून आतापर्यंत अनेक प्रयोग राबवण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे […]

मी फोकनाड लीडर नाही : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर: ‘मी फोकनाड लीडर नाही, मी जे म्हणतो ते करुन दाखवतो’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः केलेल्या विकास कामाच्या दाव्यांबद्दल रोखठोक विधान केलं आहे. बंजारा समाजाच्या वतीने नागपुरात बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गडकरी बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी पूरक धंदा म्हणून आतापर्यंत अनेक प्रयोग राबवण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इथेनॉल निर्मिती. इथेनॉल निर्मिती करुन शेतकऱ्यांची समृद्धी साधता येते. देशात इथेनॉल निर्मिती करुन शेतकरी पेट्रोल – डिझेलचा पर्याय ठरू शकतो असं गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांना डिझेल मुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचं गडकरींनी यावेळी सांगितले.

बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत ?   

तसेच नागपूरच्या अंबाझरी तलावावर 30 हजार आसन क्षमतेच ओपन थिएटर तयार करणार असून, त्याला स्वर्गीय वसंतराव नाईक याचं नाव देण्यात येईल, असं गडकरी म्हणाले.

मागच्या निवडणुकीत मी 3 लाख मतांनी निवडून आलो, यावेळी 5 लाखाची लीड असेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. पुन्हा निवडून आल्यानंतर विदर्भाचा संपूर्ण कायापालट करण्याची ग्वाही गडकरींनी दिली.

नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले 

नागपूरमध्ये भाजप नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात सामना होणार आहे.  नाना पटोले यांनी 2014 च्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मोदी सरकारवर नाराज होत, पुन्हा काँग्रेसवापसी केली. भंडारा-गोंदियाचे खासदार राहिलेल्या नाना पटोले यांना काँग्रेसने यंदा नागपुरातून उमेदवारी दिली असून, पटोले थेट नितीन गडकरी यांना भिडणार आहेत.

नितीन गडकरी हे भाजपचे राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील मातब्बर नेते आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी यांचे नागपूर हे होमग्राऊंड आहे. तिथे ते कधीही पराभूत झालेले नाहीत. शिवाय, नागपुरात रा. स्व. संघाची ताकदही त्यांच्या मागे कायम उभी असते. त्यामुळे त्यांच्याशी लढत ही नाना पटोले यांच्यासाठी आव्हानात्मक असेल, एवढे निश्चित.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या

नितीन गडकरींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं ओबीसी कार्ड 

भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित