पवारांना भेटण्याचा काहीही संबंध नाही, फडणवीसांवर माझा विश्वास : जयकुमार गोरे

| Updated on: Nov 16, 2019 | 7:22 PM

मी कुटुंबासोबत होतो. त्यामुळे पवारांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," अशी प्रतिक्रिया भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी (Jaykumar gore meet sharad pawar) दिली.

पवारांना भेटण्याचा काहीही संबंध नाही, फडणवीसांवर माझा विश्वास : जयकुमार गोरे
Follow us on

पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोदी बागेत राहतात याची मला कल्पना नाही. मी माझ्या खासगी कामनिमित्त त्या ठिकाणी गेलो (Jaykumar gore meet sharad pawar) होतो. मी कुटुंबासोबत होतो. त्यामुळे पवारांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी प्रतिक्रिया भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी (Jaykumar gore meet sharad pawar) दिली. जयकुमार गोरे यांनी नुकतंच शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र मी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केलं (Jaykumar gore meet sharad pawar) आहे.

“शरद पवार मोदी बागेत राहतात याची मला कल्पना नाही. मी माझ्या खासगी कामानिमित्त त्या ठिकाणी गेलो होतो. मी कुटुंबासोबत होतो. त्यामुळे पवारांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पवार मला भेटतील असेही मला वाटत नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याचा काहीही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली.

“मी भाजपसोबत आहे. माझा विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आजच्या घडीला दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही,” असेही ते (Jaykumar gore meet sharad pawar) म्हणाले.

भाजपचे सरकार येईल असे जयकुमार गोरे यांना विचारले असता ते म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपचे सरकार येणार नाही असे म्हणायचे कारण नाही. त्यामुळे थांबा आणि पाहा. तुम्हाला दिसेल.”

भाजपचे काही आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यावरही जयकुमार गोरे यांनी टीका केली (Jaykumar gore meet sharad pawar) आहे.

“जयंत पाटील काय म्हणतात हा त्यांचा विषय आहे. ते नेहमी असंच बोलत असतात. हा आमदार त्याच्या संपर्कात, तो आमदार यांच्या संपर्कात असे ते नेहमी सांगत असतात. आता कोण कोणाच्या संपर्कात आहे हे कळण्यासाठी अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तुम्हाला समजेल की सत्तास्थापन होताना कोण कोणाच्यासोबत आहे,” असे जयकुमार गोरे म्हणाले.