औरंगाबाद : पराभवाचं आत्मचिंतन करण्यापेक्षा यापुढे आणखी जास्त काम होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पराभवानंतर दिली. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. या विजयानंतर एमआयएमकडून शहरभरात हिरवा गुलाल उधळण्यात आला. इम्तियाज जलीलला सरळ करणार, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. जलील यांना हिरवा साप अशी उपमाही खैरेंनी दिली.
माझं बॅडलक होतं म्हणून मी पराभूत झालो. मी कुठेतरी कमी पडलो. पराभवानंतर आता आत्मचिंतन करण्यापेक्षा यापुढे जास्त काम होईल. तो जो हिरवा साप निवडून आला ना… आता बाळासाहेबांचे भगवे आहे ते उद्धजींच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि कोणत्याही परिस्थितीत परत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. साहेबांनी मला ताकद दिली. कालपर्यंत मंत्रिपदाचा दावेदार होतो. पण खंत वाटते. पण बाळासाहेब म्हणायचे नशिबात असते ते होणार… बचेंगे तो और भी लढेंगे, असं म्हणत खैरेंनी पराभव स्वीकारला.
पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशीची चर्चा केली. बॅडलक होतं असं त्यांना सांगितलं. पक्षप्रमुख मिनिटा-मिनिटांचा रिपोर्ट घेत होते म्हणून त्यांना सर्व ठाऊक होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, युतीत दगाफटका झाल्याचा आरोपही खैरेंनी केला होता. पण तो वेगळा मॅटर आहे, त्यावर आता बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं.
इम्तियाज जलीलला सरळ करणार. त्याने काल किती धिंगाणा केला… हिरवा गुलाल… महिला मुलींवर हिरवा गुलाल उधळला… माझ्या ऑफिसवर जबरदस्त अटॅक केला…गाड्या फोडल्या…त्यांना सोडणार नाही…जे 1988 च्या आधी त्यांच्या भाषेत औरंगाबाद होते. आम्ही संभाजी नगर केलं. आम्ही ते पुढे तसेच ठेवू, असंही खैरे म्हणाले.
औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांची सलग पाचव्यांदा खासदार होण्याची संधी हुकली. आश्चर्यकारकरित्या इम्तियाज जलील यांचा विजय झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी मोठ्या प्रमाणात मतं मिळवली. या मतांमुळे विभाजन झालं आणि अत्यंत कमी फरकाने खैरेंचा पराभव झाला.
व्हिडीओ : पराभवानंतर खैरे काय म्हणाले?