जर बाळासाहेब असते, तर असं घडलंच नसतं : रावसाहेब दानवे

| Updated on: Nov 17, 2019 | 6:55 PM

"जर बाळासाहेब आज असते, तर हे घडलंच नसतं," असेही दानवे (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) म्हणाले. औरंगाबादेत एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.

जर बाळासाहेब असते, तर असं घडलंच नसतं : रावसाहेब दानवे
Follow us on

औरंगाबाद : “दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेना-भाजप युतीचे सूत्र घालून दिलं होतं. त्याच सूत्राप्रमाणे शिवसेनेने जावं आणि जनमताचा आदर करावा अशी आमची इच्छा आहे.” असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) केलं. तसेच “जर बाळासाहेब आज असते, तर हे घडलंच नसतं,” असेही ते (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) म्हणाले. औरंगाबादेत एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) केलं.

भाजप शिवसेना युतीचे जनक बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आहेत. 1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते. त्यावेळी शिवसेनेकडून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि भाजपचा उपमुख्यमंत्री झाला. असेही दानवे यावेळी म्हणाले.

भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढली होती. भाजप शिवसेनेने महाजनादेश यात्रा काढल्यानंतर आमच्या आघाडीला जनतेने बहुमत दिलं. या बहुमताचा आदर दोन्ही पक्षांनी केला पाहिजे. पण त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य दानवे यांनी (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) केले.

सत्तास्थापनेसाठी जनतेच्या बहुमताचा आदर केला पाहिजे असे सांगण्यासाठी विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. हे त्यांनीही पत्रकार परिषदेत मान्य केलं. असेही ते म्हणाले. आम्हाला मुख्यमंत्रिपद देत असाल, तर बोला असेही ते म्हणाले होते, असेही दानवे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चांगला कारभार झाला आहे. त्यामुळे नेतृत्व बदलायचं काही कारण उद्भवत नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे कोणी कितीही बोललं तरी नेतृत्वात बदल होणार नाही असेही रावसाहेब दानवे यांनी ठणकावून (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) सांगितले.