बारामती : “राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार यातून एक हाती सत्तेवर आले आहेत. भाजपला हरवण्यासाठी यांना एकत्र यावं लागतंय यातच आम्हाला आनंद आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) केलं आहे. जर हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं,” असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीला (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) दिलं आहे.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. निवडणुका झाल्यानंतर या तिन्ही पक्षांची आघाडी होते. जर यांनी भविष्यात एकत्रित निवडणूक लढवली तर जनता कोणाला साथ देते हे आपोआप समोर येईल असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. जर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी,” असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
“मुख्यमंत्र्यांकडेच कोणतेच खाते नाही अशी स्थिती सध्या राज्यात आहे. शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 14 मंत्रिपदं मिळाली आहेत. तकलादू खाती शिवसेनेसह काँग्रेसकडे दिलेली आहेत. मात्र हे सरकार फार काळ चालणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) सांगितलं.
“शिवसेनेनं या सरकारपायी हिंदुत्ववादी भूमिका सोडली. सावरकर यांच्यासारखे अनेक समोर आले तरी हे बोलायला तयार नाहीत. सावरकरांच्या कुटुंबियांनी अनेकदा मुख्यमंत्र्याना भेटीची वेळ मागितली मात्री त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध नसल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.”
नाराजी फार काळ टिकत नाही..!
महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आपापले वाद संपवावेत आणि जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावं असं सांगतानाच या आघाडीतील नेत्यांची नाराजी फार काळ टिकेल असं वाटत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सत्ता ही फेविकॉलप्रमाणे असते, त्यामुळं प्रत्येकजण तिथे चिटकून राहतो, असंही सांगायला चंद्रकांत पाटील विसरले (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) नाहीत.