मुंबई : (Maharashtra Politics) राज्यातील राजकीय नाट्यानंतर नेत्यांमधील मतभेद आणखी वाढले असतील. पण (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्ष आणि (Legislative Council Speaker ) विधानपरिषदेचे सभापतीपदी जावाई आणि सासरे राहणार असल्याचे चित्र आहे. कारण भाजप तर्फे विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत. शिवाय बहुमताचे संख्याबळ असल्यामुळे (Rahul Narvekar) राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. एका सभागृहात सासऱ्याची कार्यशैली समोर येणार आहे तर विधानसभेच्या माध्यमातून नवख्या असणाऱ्या राहुल नार्वेकरांना आपल्या कामाची चुणूक दाखवण्याची संधी आहे. असे असले तरी विधान परिषदेपेक्षा विधानसभेचे कामकाज चालवणं जास्त आव्हानात्मक आहे. पण सासऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करुन घेता येईल असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
विधानसभा अध्यक्ष पद म्हणजे मोठी जबाबदारी आहे. एका पक्षात काम करणे सोपे पण या पदावरील व्यक्तीला सर्वांनाच समावून घेऊन काम करावे लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेला मोठी परंपरा आहे. ती कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न तर करावेच लागणार आहे पण कुणाचे मन दुखवणार नाही शिवाय निर्णयाचा परिणाम विकास कामावर होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यातूनच हे शक्य होणार आहे. त्यामुळे विकासकामे आणि पक्ष मतभेदावरुन होणारे वादंग हे मिटवून घेण्यासाठीही आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार असल्याचे नार्वेकर यांनी त्या पदावर बसण्यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेत च्या सभापती पदी सासरे आणि विधानसभा अध्यक्ष पदावर जावई पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर हे आहेत. जे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत. पण सासऱ्यांचा कामातील अनुभवचा फायदा आपल्याला होईल असा आशावाद राहुल नार्वेकर यांना आहे. शिवाय सर्व सदस्यांच्या सहकार्यातूनच चांगले काम घडणार आहे. यातूनच सभागृहाचे महत्व आणि परंपरा जोपासली जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
आपल्याला कामकाजामध्ये सासऱ्यांच्या अनुभवाचा फायदा होईल पण त्यापेक्षा विधानसभा हे मोठे सभागृह आहे. त्यामुळे सर्व कसब पणाला लावून काम करावे लागणार आहे. अध्यक्ष पद असल्यामुळे आपल्या एका निर्णयाचा परिणाम मतदार संघातील विकास कामावर होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचेही नार्वेकर म्हणाले आहेत. असे असले तरी वरच्या सभागृहात सासरे आणि खालच्या सभागृहात जावाईबापूंचा कारभार राज्याला पाहता येणार आहे.