[svt-event title=”पवारांची माघार हा युतीचा विजय- मुख्यमंत्री” date=”11/03/2019″ class=”svt-cd-green” ] युतीचा हा मोठा विजय आहे, देशात मोदींना पाठिंबा देणारे वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते की शरद पवार हवा का रुख भाप लेते है, यावेळी त्यांना हे समजले असावे म्हणून माघार घेतली असावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [/svt-event]
[svt-event title=”मंत्रालयाजवळ तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न” date=”11/03/2019″ class=”svt-cd-green” ] मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ एका तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न. 27 वर्षीय विनायक बाळासाहेब वेद पाठक नावाचा हा तरुण मूळचा उस्मानाबादचा शेतकरी आहे. कर्जबाजारी असल्याने आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं तरुणाला ताब्यात. [/svt-event]
[svt-event title=”शरद पवार माढ्याबाबत साशंक” date=”11/03/2019″ class=”svt-cd-white” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र सद्यस्थिती पाहता शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत साशंक आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून आता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवार माढ्यातून उमेदवारी मागे घेण्याचे संकेत आहेत. [/svt-event]
[svt-event title=”नाना पटोलेंनी गडकरींविरोधात कंबर कसली” date=”11/03/2019″ class=”svt-cd-green” ] ‘मी गडकरींविरोधात नागपुरात निवडणूक लढल्यास प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यात याबाबत बोलणं झालं आहे. प्रकाश आंबेडकर नागपुरात मतांचं विभाजन होऊ देणार नाही. दोन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढण्यासाठी नाना पटोले यांनी कसली कंबर [/svt-event]