औरंगाबादेत खुर्चीवरुन वाद, खासदार जलील यांच्या खुर्चीवर खैरे बसले

| Updated on: Jan 09, 2020 | 11:52 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात खुर्चीचे मानपान नाट्य पाहायला (imtiyaz jaleel and chandrakant khaire fight on seating arrangement) मिळाले.

औरंगाबादेत खुर्चीवरुन वाद, खासदार जलील यांच्या खुर्चीवर खैरे बसले
Follow us on

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात खुर्चीचे मानपान नाट्य पाहायला (imtiyaz jaleel and chandrakant khaire fight on seating arrangement) मिळाले. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे समोरच्या खुर्चीवर बसल्याने इम्तियाज जलील यांना खुर्चीसाठी कसरत करावी लागली. खासदार इम्तियाज जलील यांनी या खुर्ची नाट्याला दुजोरा दिला. तर खैरेंनी मात्र खुर्चीचा वाद न झाल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बसले होते. यावेळी आदित्य ठाकरेंच्या बाजूला बसण्याची जागा ही इम्तियाज जलील यांना देण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी अचानक चंद्रकांत खैरे येऊन बसले. यामुळे या बैठकीत खुर्चीचे मानपान नाट्य पाहायला मिळाले.

“या बैठकीनंतर प्रोटोकॉलनुसार बसण्याची जागा करण्यात आली होती. मात्र आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे त्यांना अजूनही तेच खासदार आहेत असे वाटतं आहे. त्यामुळे ते तिथे बसले म्हणून मला बाजूला बसावं लागलं. पण माझ्यासाठी खुर्ची महत्वाची नसून जिल्ह्याच्या प्रश्न महत्त्वाचे आहे. त्याबाबत आम्ही चर्चा केली. मात्र त्यांच्या नेत्यांनी मला पुन्हा बोलवून घेऊन शेजारी बसायला सांगितलं.” अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

“मी जिल्ह्याचा नेता आहे. मी 20 वर्ष खासदार होतो आणि मला जिल्ह्याची माहिती आहे. शिवसेनेचा नेता आहे. ती माझीच खुर्ची होती, ते नंतर आले. मला बसण्याचा अधिकार आहे. मी जिल्ह्याचे प्रश्न सोडवतो आणि खुर्चीचा वाद झालाच नाही.” असे चंद्रकांत खैरे यांनी (imtiyaz jaleel and chandrakant khaire fight on seating arrangement) सांगितले.

औरंगाबादमधील उस्मानाबाद जिल्ह्यात विविध समस्यांबाबत उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक घेतली. यावेळी जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.